The गडविश्व
गडचिरोली, २७ नोव्हेंबर : श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था द्वारा संचलित फुले – आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, गडचिरोली आणि सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्त “सामाजिक न्याय पर्व” पंधरवडा कार्यक्रम २६ नोहेंबर ते ६ डिसेंबर २०२२ महापरिनिर्वाण दिना पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरवात संविधान रॅली ने करण्यात आली. महाविद्यालयात सर्वप्रथम महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला मालार्पण व दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य ज्येष्ठ प्रा. यादव गहाणे, समाज कल्याण निरीक्षक गोविंदवार आणि बार्टी प्रकल्प प्रमुख गणवीर यांची प्रमुख उपस्थिती तर सिनेट सदस्य प्रा. विवेक गोर्लावर व प्रा. रुपेंद्रकुमार गौर आणि प्रा विनोद कुकडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
संविधान दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गीतातून व मान्यवरांनी संविधानाचे महत्त्व सांगून अंगीकृत करावे असे मत मांडून संविधाना विषयी माहिती व विविध सामाजिक योजनांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दीपक तायडे यांनी केले तर आभार ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ.वर्षा तिडके यांनी केले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रंथालयीन कर्मचारी समाज कल्याण कार्यालय गड सर्व कर्मचारी महा. विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.