शेतशिवरातील ८ ड्रम मोह फुलाचा सडवा व साहित्य नष्ट

97

– बेतकाठी गवसंघटन व मुक्तिपथ ची संयुक्त कृती
The गडविश्व
गडचिरोली, दि. २७ : कोरची पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बेतकाठी येथे मुक्तीपत गाव संघटन व तालुका चमूने संयुक्त कृती करीत शेतशिवारतील 8 ड्रम मोह फुलाचा सडवा व साहित्य असा एकूण ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला.
बेतकाठी येथील अवैध दारूविक्री बंदीसाठी गाव संघटनेच्या महिलांनी पोलिस विभागाच्या सहकार्याने अथक परिश्रम घेतले. त्यामुळे २०१७-१८ मध्ये वर्षभर अवैध दारूविक्री बंद होती. परंतु, त्यानंतर अवैध विक्रेत्यांनी मुजोरीने गावाच्या निर्णयाचे उल्लंघन करून चोरट्या मार्गाने अवैध व्यवसाय पुन्हा सुरू केला. तेव्हापासून गावात अवैध दारूविक्री होत असून जवळपास १० विक्रेते सक्रिय आहेत. दारूविक्री थांबविण्यासाठी पोलीस विभागाच्या सहकार्याने गाव संघटनेकडून वारंवार कृती केली जात आहे. परंतु, दारूविक्रेते शेतशिवाराचा आधार घेत अवैध व्यवसाय करीत आहेत. अशातच मुक्तीपथ टीम व गाव संघटनेने संयुक्त कृती करीत शेतशिवरात शोधमोहीम राबविली असता, ८ ड्रम मोहफुलाचा सडवा, साहित्य असा एकूण ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. यावेळी तालुका संघटीका निळा किन्नाके, प्रेरक अरुणा गोन्नाडे, स्पार्क कार्यकर्ता भूषण डोकरमारे यांच्यासह गाव संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

(#muktipath #thegdv #thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here