६ ला कुरखेडा येथे प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

292

The गडविश्व
गडचिरोली, ०४ ऑक्टोबर : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर,गडचिरोली व श्री गोविंदराव मुनघाटे आर्टस ॲन्ड सायन्स्‍ कॉलेज कुरखेडा यांच्या संयुक्त्‍ विद्यमाने ०६ आक्टोबर २०२३ रोजी श्री गोविंदराव मुनघाटे आर्टस ॲन्ड सायन्स्‍ कॉलेज कुरखेडा येथे ठिक ११.०० ते ४.०० वाजतापर्यंत प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यांत येत आहे.
एल.आय.सी. गडचिरोली करीता इन्शुरन्स अडव्हायझर म्हणून १०० पदांकरिता सदर प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे. उमेदवारांना रोजगाराचा लाभ घेण्यासाठी‍ सदर प्लेसमेंट ड्राईव्हकरिता ईच्छूक असलेल्या उमेदवारांनी स्वत:चा बायोडाटा, आधार कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या झेराक्स सह स्वखर्चाने ०६ ऑक्टोबर २०२३ रोजी श्री गोविंदराव मुनघाटे आर्टस ॲन्ड सायन्स्‍ कॉलेज कुरखेडा येथे उपस्थित राहून प्लेसमेंट ड्राईव्हचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांनी केले आहे. अधिक माहितीकरिता कार्यालयाशी 07132-222368 या क्रमांकावर संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here