-गाव पातळी व्यसन उपचार शिबिराचा घेतला लाभ
The गडविश्व
गडचिरोली, दि. १२ : गडचिरोली जिल्ह्यातील रुग्णांना वेळेवर उपचार मिळावे, या उद्देशाने मुक्तिपथ व गाव संघटनेच्या संयुक्त विद्यमाने गाव पातळीवर व्यसन उपचार शिबिराचे आयोजन केले जाते. नुकतेच जिल्ह्यातील विविध गावांमध्ये आयोजित शिबिराच्या माध्यमातून ५६ रुग्णांनी उपचार घेत दारूचे व्यसनामुळे उद्धवणाऱ्या समस्येबाबत चिंतन केले.
गडचिरोली जिल्ह्यातील विविध गावांमध्ये व तालुका पातळीवर व्यसन उपचाराची सुविधा उपलब्ध आहे. या माध्यमातून अनेकांना लाभ देखील झाला असून त्यांचे संसार सुखी झाले आहे. नुकतेच दुर्गम तालुका म्हणून ओळख असलेल्या एटापल्ली तालुक्यातील गडेरी येथे १२ रुग्णाने उपचार घेतला तसेच वेलमागड या गावात आयोजित व्यसन उपचार शिबिरात १० रुग्णांनी उपचार घेतला. रुग्णाची केस हिस्ट्री सयोजक दशरथ रमखाम आणि स्पार्क कार्यकर्ता उत्कर्ष राऊत यानी घेतली. रुग्णाचे समूपदेशन समूपदेशक पूजा येलूरकर यानी केले. शिबिराचे नियोजन आणि व्यवस्थापन तालुका संघटक किशोर मलेवार यानी केले. सघन गांव भेट यशस्वी करण्यासाठी गांव पाटिल तोदे कातवो, सोनू कातवो, आशा वर्कर सविता कुजूर, अंगणवाडी सेविका अनिता कातवो यांनी सहकार्य केले. धानोरा तालुक्यातील कांदाडी येथील शिबिरात ११ जणांनी लाभ घेतला तसेच सिंदेसूर (मुरूमगाव) येथे गाव पातळी एकदिवसीय शिबिर घेण्यात आला. शिबिरात १२ पेशंटने पुर्ण उपचार घेतला असून पेशंटची नाव नोंदणी जागृती मेश्राम यांनी केली. संयोजक प्रमोद कोटांगले यांनी पेशंटची केस हिस्ट्री तर समुपदेशन व ग्रुप शेषन छत्रपती घवघवे यांनी केली. शिबिराचे पूर्व नियोजन व आयोजन मुक्तिपथचे भास्कर कड्यामी यांनी केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी गाव संघटनेचे सचिव अनिल कुजुर, उषा कूजुर अंगणवाडी सेविका, अंकिता कुजूर आशा वर्कर, अनिता तिर्की, जयंती एक्का यांनी मोलाचे सहकार्य केले. कोरची तालुक्यातील हितापाडी येथील ११ रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला. रुग्णांची केस हिष्ट्री स्वप्निल बावने, स्पार्क विद्यार्थी इच्छेश गुरनुले तर समुपदेशन व तपासणी प्राजु गायकवाड यांनी केली. शिबिराचे आयोजन व नियोजन मुक्तिपथ तालुका संघटिका निळा किन्नाके, तालुका प्रेरक अरुणा गोन्नाडे यांनी केले. या उपक्रमासाठी माजी सभापती कचरीताई काटेंगे, चंपत नैताम पोलीस पाटील, रमलोताई नैताम, तुरजा कोवाची यांचे सहकार्य लाभले.

(#thegdv #gadchirolipolice #gadchirolinews #thegadvishva #muktipath )