– जय हनुमान भाद्रपद गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम
The गडविश्व
गडचिरोली, दि. २७ : स्वयं रक्तदान समिती यांच्या पुढाकाराने व जय हनुमान भाद्रपद गणेश मंडळ पाण्याच्या टाकीजवळ कुनघाडा रै यांच्या वतीने आज २७ सप्टेंबर रोजी स्थानिक किसान भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आला होते . शिबिरात एकूण ४० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
रक्तदात्यांमध्ये सचिन शिऊरकर, सुनील भुत्ते, जगन्नाथ कोसमशिले, प्रशांत पिपरे, अभय भांडेकर, निलेश पिपरे, रक्षक सातारे, गौरव भांडेकर, सुकेश सातारे, प्रकाश धोडरे, नागेश वासेकर, मनीष भुरसे, तुषार कोहळे, नितीन मोगरकर, प्रेमचंद वासेकर, राकेश सुरजागडे, दीपक कुनघाडकर, अनिकेत चव्हाण, मीनल दुधबळे, अतुल भांडेकर, बंडू वासेकर, विघ्नेश टिकले, परिमल भांडेकर, भूषण कोठारे, मनोहर कुनघाडकर, दिलखुश कुनघाडकर, आकाश बुरांडे, शुभम काबरा, ओम कोमलवार, नितेश कीरमे इत्यादींचा समावेश आहे. स्वयं रक्तदान समितीचे पितांबर टिकले यांच्या पुढाकाराने सामान्य रुग्णालय गडचिरोली येथील डॉ अशोक तुमरेटी, प्राची भैसारे, सूरज चांदेकर, हरिदास सेलोकर, जीवन गेडाम, ऐश्वर्या गोडसेलवार, प्रियांका मुडमा या चमूने रक्तदान शिबिराची प्रक्रिया पार पाडली.
सर्व रक्तदात्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अनिल कोठारे, पितांबर टिकले, लालाजी सातपुते, दामोदर गेडाम, साहिल वडेट्टीवार व गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
शिबिर यशस्वी करण्यासाठी होमदेव कोसमशिले, अविनाश सातपुते, मारोती राजापुरे, नागेश वासेकर, प्रशांत पिपरे, सुनील भूत्ते, अभय भांडेकर, जगन्नाथ कोसमशिले, गणेश मडावी, गौरव भांडेकर, निलेश पिपरे, राकेश सातारे, ओम कोमलवार, भूपेंद्र भांडेकर, योगेश कोडापे, निलेश गेडाम, सुरेश गेडाम, ज्ञानेश्वर भांडेकर, निशांत सातारे, प्रज्वल सातारे, वासुदेव वाघाडे आदींनी परिश्रम घेतले.
