– गडचिरोली येथील प्रथम श्रेणी न्यायाधीश आर. आर. खामतकर यांचा न्यायनिर्वाळा
The गडविश्व
गडचिरोली, १२ सप्टेंबर : अवैध दारु विक्री केल्याप्रकरणी आरोपीस ३ वर्षे सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा गडचिरोली येथील प्रथम श्रेणी न्यायाधीश आर. आर. खामतकर यांनी ठोठावली आहे. स्वामी नरसय्या गणवेनवार (५३) रा. मुरखळा ता.जि. गडचिरोली असे आरोपीची नावे आहेत.
१ जून २०२१ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा व पोलीस स्टाफ असे प्रोव्हीजन रेड करीता मुरखळा भागात गेले असता मुखबीर कडून खात्रीशीर गोपनिय माहितीच्या आधारे स्वामी नरसय्या गणवेनवार याच्या घरी झडती घेतली असता विदेशी दारुच्या निपा मिळून आल्याने आरोपी विरुध्द कलम ६५ (इ) म.दा.का. अन्वये नोंद करुण तपास घेतला. सदर गुन्हयाचा तपास पोहवा रमेश उसेंडी यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करुन आरोपी विरुध्द सबळ पुरावा गोळा करुन न्यायालयात दोषरोप पत्र दाखल केले असता न्यायालयाने SSC नं. २८९/२०२१ अन्वये खटला चालवुन फिर्यादी व साक्षीदार तसेच सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्र धरुन आज मंगळवार १२ सप्टेंबर रोजी आरोपी स्वामी नरसय्या गणवेनवार यास प्रथम श्रेणी न्यायाधीश आर.आर. खामतकर यांनी कलम ६५(इ) अन्वये ०३ वर्ष सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील बी. के. खोब्राागडे यांनी कामकाज केले तसेच संबंधीत प्रकरणात साक्षीदारांशी योग्य समन्वय साधून प्रकरणाची निर्गती करीता पोहवा दिनकर मेश्राम, पोअं हेमराज बोधनकर यांनी योग्य भूमिका पार पाडली.
(the gadvishva, gadchiroli, gadchiroli news, crime news)