The गडविश्व
गडचिरोली, दि. १० : अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केले, निवडणूकपूर्व जाहिर केलेल्या जाहिरनाम्यात महायुती सरकारने लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्यार असल्याचे जाहीर केले मात्र, सदर अर्थसंकल्पातील भाषनात लाडक्या बहिणींचा साधा उल्लेख ही करण्यात आलेला नाही. शेतकरी, महिला आणि युवकांसाठी कुठलाही प्रभावी निर्णय घेण्यात आलेला नाही.
अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषानात गडचिरोली जिल्हाचा विशेष उल्लेख करत, दाओस मध्ये झालेल्या करारानुसार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होईल व 7 हजाराहुन अधिक रोजगारनिर्मिती होईल असे बोलले, मात्र लॉयड मेटल सारखी मोठी कंपनी जिल्ह्यात असताना देखील जिल्ह्यातील युवकांना रोजगारासाठी बाहेर राज्यात जावे लागत आहे, ही परिस्थिती पाहता दाओस मध्ये करार करण्यात आलेल्या कंपनी खरंच जिल्ह्यातील युवकांना रोजगार देणार कीं बाहेरचे रोजगार आयात करणार असाही प्रश्न निर्माण होत आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील दवाखाने, रस्ते, शाळा, वस्तीगृह यांची परिस्थिती भयावह आहे मात्र त्यांच्या विकासासाठी कुठलीही मोठी घोषणा किंवा निधी या बजेट मध्ये झाली नाही शिवाय जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या विमानतळा करीता शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी बळवण्यात येणार असून यातून सरकार फक्त उद्योगपती मित्रांचा फायदा करू पाहत असल्याचे स्पष्ट दिसते. तर दुसरीकडे गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाच्या नावावर फक्त येथील नैसर्गिक वनसंपत्ती लुटण्याचा डाव करत आहे कीं काय अशी शंका गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी उपस्थिती केली आहे.
