राज्यसरकारची शिधापत्रिकाधारकांना दिवाळी भेट : १०० रुपयांत मिळणार रवा, डाळ, साखर आणि तेल

991

– मंत्रिमंडळाच्या बैठकित निर्णय
The गडविश्व
गडचिरोली,४ ऑक्टोबर : दिवाळीच्या निमित्ताने राज्यातील शिधापत्रिकाधारकांना शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज केवळ १०० रुपयांत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या संचामध्ये प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना प्रति १ किलोच्या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व १ लिटर पामतेल याचा समावेश असणार आहे. राज्यातील १ कोटी ७० लाख कुटुंबांना म्हणजेच सुमारे ७ कोटी लोकांना याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे. हा संच एक महिन्याच्या कालावधीकरिता देण्यात येऊन त्याचे वितरण ई-पॉस प्रणालीद्वारे करण्यात येणार असून यासाठी येणाऱ्या एकूण ५१३ कोटी २४ लाख खर्चास देखील मान्यता देण्यात आली आहे.

सदर शिधावस्तूंचा संच दिवाळीपूर्वी वाटप व्हावा, त्याचप्रमाणे कुठल्याही तक्रारी येऊ नये याची खबरदारी अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here