मोह सडव्यासह साडेचार लाखांचा मुद्देमाल नष्ट

159

The गडविश्व
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील सीमावर्ती भागात असलेल्या जांभळी जंगलपरिसरात दारू गाळण्यासाठी टाकलेला मोहफुलाचा सडवा व साहित्य असा एकूण ४ लाख ५० हजारांचा मुद्देमाल नष्ट केल्याची कृती गडचिरोली व धानोरा मुक्तिपथ तालुका चमू व गावसंघटना यांनी संयुक्तरित्या शनिवार दिनांक ११ जून २०२२ रोजी केली.
गडचिरोली तालुक्यातील रानभुमी व सीताटोला येथील अवैध दारूविक्रेत्यांच्या माध्यमातून तालुक्यातील किरकोळ विक्रेत्यांना अवैध दारू पुरवठा केला जातो. या विक्रेत्यांनी जांभळी जंगलपरिसरात मोहफुलाचा सडवा टाकला असल्याची माहिती, गावसंघटनेच्या द्वारा, मुक्तिपथ चमूला मिळाली. प्राप्त माहितीच्या आधारे गडचिरोली व धानोरा मुक्तिपथ तालुका चमू व गावसंघटना सदस्यांनी जंगलपरिसरात शोधमोहीम राबविली असता, तीन ठिकाणी जवळपास ४० ड्रम मोहफूलाचा सडवा व साहित्य मिळून आले. घटनास्थळावर आढळून आलेला जवळपास ४ लाख ५० हजारांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. या कारवाईमुळे अवैध दारूविक्रेत्यांचे मोठ्या नुकसान करण्यात यश आले आहे. या मोहिमेत गडचिरोली व धानोरा तालुका चमूसह गाव संघटनेचे सदस्य सहभागी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here