मॅजिक बस तर्फे आजपासून बाल अधिकार सप्ताह साजरा

68

The गडविश्व
पवनी, १४ नोव्हेंबर : मॅजिक बस इंडीया फाउंडेशन स्केल प्रकल्प पवनी तर्फे मॅजिक बस कार्यक्षेत्रात येणाऱ्या विविध शाळांमध्ये बाल अधिकार सप्ताह १४ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर पर्यन्त साजरा करण्यात येत आहे.
आज सोमवार १४ नोव्हेंबर ला बालक दिनाचे औचित्य साधून भुयार, काकेपार व सावरला येथील विद्या कृषी विकास हायस्कूल भुयार, गांधी विद्यालय सावरला, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरला, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काकेपार येथे मॅजिक बस जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक निक्की व तालुका प्रकल्प व्यवस्थापक विनोद शंभरकर यांच्या मार्गदर्शनात बाल हक्क सप्ताह अभियान आयोजित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्देश बालकांना त्यांचे अधिकाराची ओळख निर्माण करून देणे, पालक व समुदयामध्ये बालकांचे अधिकाराबाबत जाणीव जागृती करणे, स्थानिक stake holders यांचा बालकांचे विकासात सहभाग वाढविणे, बालकांचे विकास व जतन करणाऱ्या सरकारी यंत्रणेचे आभार मानून त्यांचा बालकांचे विकासात सहभाग वाढविणे.
बाल हक्क सप्ताह निमित्त समाजात बाल हक्क संदर्भात जनजागृती व्हावी या उद्देशाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करून बाल हक्क सप्ताह साजरा करण्यात येत आहे, या कार्यक्रमाचे माध्यमातून बालक कोणास म्हणावे?, बालकांचे हक्क कोणते, बालकांचे हक्क जतन करणे कोणाची जबाबदारी, बालकांसाठी कार्यरत शासकीय आणि निमशासकीय यंत्रना, विद्यार्थ्यांच्या विकासासाठी शिक्षणाचे महत्त्व, चाईल्ड हेल्पलाईन नंबर १०९८ याबाबत विद्यार्थ्यांना आणि पालकांना माहिती देऊन समुदायात जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद तसेच मॅजिक बस शाळा साहाय्यक अधिकारी वसंत पोटे व समुदाय समन्वयक पूजा वाणी, गुरुदेव सेलोकर, जगदिश मालोदे व सर्व विद्यार्थी यांचे सहकार्य मोलाचे ठरले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here