मुजोर अवैध दारूविक्रेत्यांना तडीपार करा

205

– महिलांनी उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांकडे मागितली ओवाळणी
The गडविश्व
गडचिरोली, १२ ऑगस्ट : देसाईगंज तालुक्यातील मुजोर अवैध व्यवसायिकांना तडीपार करण्यात यावे तसेच दारूविक्रेत्यांवर 93 चे बॉंड बनवून योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्याची ओवाळणी देसाईगंज तालुक्यातील विविध गावांतील महिलांनी उपविभागीय महसूल अधिकारी जे.पी.लोंढे यांना राखी बांधून मागीतली.
देसाईगंज तालुक्यातील विविध गावातील गाव संघटना व मुक्तिपथ तालुका संघटनेच्या वतीने रक्षाबंधन हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महिलांनी उपविभागीय अधिकारी जे. पी. लोंढे यांना राखी बांधून विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. तसेच पोलीस निरीक्षक महेश मेश्राम यांना सुद्धा राखी बांधून ‘दादा आम्हाला आमच्या तालुक्यातील दारू आणि अवैध धंदे बंद करून बहिणींचा संसार सुखाचा होण्याचा आशीर्वाद द्या’ अशी ओवाळणी मागीतली. सोबतच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार आश्रमा यांनाही राखी बांधून शहरातील विविध समस्यांचे निराकरण करण्याची मागणी केली.
यावेळी तालुका संघटनेच्या अध्यक्षा शेवंता अवसरे, उपाध्यक्ष निलोफर शेख, सचिव जयश्री कुलकर्णी, मंगला देवधागले ,कल्पना कापसे, ढोरे,फाये, पिंकी ठकराणी, मुक्तिपथ तालुका संघटीका भारती उपाध्ये, पल्लवी मेश्राम,सुषमा वासनिक, अनुप नंदगिरवार यांच्यासह तालुक्यातील विसोरा ,कोंढाळा, कुरूड, शंकरपुर, आमगाव या गावातील व देसाईगंजमधील राजेंद्र वॉर्ड, कस्तुरबा वॉर्ड , कन्नमवार वॉर्ड, सिंधि मोहल्ला, जुनी वडसा वॉर्ड , नैनपूर, हटवार एरिया तुकुम वॉर्ड, आंबेडकर वॉर्ड, फवारा चौक आदी ठिकाणच्या महिला उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here