माजी न.प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर यांच्या निवासस्थानावर ‘मन की बात’ कार्यक्रम

209

– प्रधाननमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ च्या माध्यमातून जनसामान्याशी संवाद
The गडविश्व
गडचिरोली, ३१ जुलै : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ च्या माध्यमातून जनसामान्याशी संवाद साधण्याचा कार्यक्रम आहे. भारताला स्वातंत्र मिळुन ७५ वर्षे पुर्ण होणार आहेत. याचे औचित्य साधून आज ३१ जुलै सकाळी ११:०० वाजता माजी न.प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर याच्या निवासस्थानी ‘मन कि बात’ कार्यक्रम पाहण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यात सुध्दा तालुका स्तरावर, शहरात, प्रत्येक बुथवर कार्यक्रम घेण्यात आले.
आज लांझेडा व इंदिरानगर येथे माजी नगर परिषद उपध्यक्ष अनिल कुनघाडकर, भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर महामंत्री हर्षल गेडाम यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘मन की बात’ कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी बुथ प्रमुख मंगेश वैरागडे, निखिल गुंडमवार, लालाजी वैरागडे, देंवेद्र कुनघाडकर, प्रितम चापले, आदिल बनकर, वैभव बोबाटे, मनोज जवादे, प्रमोद भांडेकर, रविद्र कुनघाडकर, रोशनजी नैताम, चेतन लिंगलवार, विनोद मडावी, विक्कि कोवे आदि कार्यकर्ते ‘मन कि बात’ कार्यक्रमाला उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here