पोलीस असल्याची बतावणी करून फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या आवळल्या मुसक्या

658

– कारवाईत ८ लाख ४५ हजरांचा मुद्देमाल जप्त, ४ आरोपी अटकेत
The गडविश्व
वर्धा : पोलीस असल्याची बतावणी करून फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या वर्धा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक केली असून ८ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अली रजा उर्फ अली बाबा शब्बीर बेग ईराणी (४७), शेख शाहरुख रईस (२८), रियाज रशीद शेख (३५), अविनाश लक्ष्मण गायकवाड (२९) असे अटकेतील आरोपींची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, अशोक राजेश्वर मरडवार (७८) हे ९ मे रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास राममंदिर गोल बाजार वर्धा येथे ज्युपिटर मोपेड दुचाकीने जात असताना पाषाण चौक, वर्धा या ठिकाणी मोटरसायकलने आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांना थांबवून पोलीस असल्याची बतावणी करून सध्या वातावरण बेकार आहे असे म्हणून अंगावरील दागिने किंमत ७५ हजार असा मुद्देमाल गाडीच्या वर असलेल्या पिशवीत ठेवण्यास सांगितले व त्यांना बोलण्यात व्यस्त ठेऊन पिशवीतील मुद्देमाल काढून घेऊन पसार झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्ष्यात येताच मरडवार यांनी पोलीस स्टेशन वर्धा येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस स्टेशन वर्धा शहर व स्थानिक गुन्हे शाखा असे पोलीस अधिकारी व अंमलदार प्राप्त माहितीच्या आधारे अहमदनगर व औरंगाबाद जिल्ह्यात जाऊन आरोपींना अटक केली. आरोपींकडून दागिने, चारचाकी व दुचाकी वाहन असा एकूण ८ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन वर्धा व स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदारांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here