देसाईगंज तालुक्यात घरफोडी करणारी टोळी सक्रिय

459

– नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे देसाईगंज पोलिसांचे आवाहन
The गडविश्व
देसाईगंज : तालुक्यात मागील काही दिवसात घरफोडी, तसेच रस्त्यावर अडवणूक करून चोरी करण्याचा प्रयत्न आशा प्रकारच्या घटना उघडकीस आल्या असून तालुक्यात घरफोडी करणाऱ्यां टोळ्या सक्रिय असल्याचे निदर्शनास येते आहे. याकरिता देसाईगंज पोलिसांनी नागरिकांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
तालुक्यात गेल्या काही दिवसांपूर्वी शहरातील पत्रकाराच्या घरी घरफोडी करून मुद्देमालासह ऐवज लंपास करण्यात आला होता तसेच तालुक्यातील शंकरपूर चोप मार्गावर ज्वेलर्स चालकाची अडवणूक करून लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. सदर घटना लक्षात घेता तालुक्यात घरफोडी करणारी टोळी सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. याकरिता देसाईगंज पोलिसांनी नागरिकांना सतर्क करून बाहेर गावाला जातांना किमती सामान घरी ठेवू नये, बाहेरगावी जातांना पोलीस ठाण्याला माहिती देण्यात यावी, शक्य असल्यास घरी एका व्यक्तीस ठेवावे, संशयीत इसम रात्रोच्या सुमारास दिसून आल्यास पोलीस ठाण्याला कळवावे असे आवाहन देसाईंगज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश मेश्राम यांनी नागरिकांना केले आहे.

पोलिसांसमोर मोठे आव्हान

तालुक्यात घरफोडी तसेच चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिक भयभीत झाले आहे. चोरी करणाऱ्या टोळीस जेरबंद करावे अशी नागरिकांकडून मागणी होत आहे. तालुक्यात चोरी करणारी टोळी सक्रिय असल्याने चोरट्यांचा मुसक्या आवळण्याचे मोठे आव्हान देसाईगंज पोलिसांसमोर उभे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here