चोप-शंकरपूर मार्गावर चोरीचा प्रयत्न : अवघ्या १२ तासात चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात देसाईगंज पोलीसांना यश

1043

– आरोपींना चार दिवसांनी पोलीस कोठडी
The गडविश्व
देसाईगंज : तालुक्यातील चोप-शंकरपूर मार्गावरुन रात्रोच्या सुमारास दुचाकीस्वारास तीन इसमांनी अडवणूक करून बळजबरीने जवळ असलेला सामान चोरी करण्याचा प्रयत्न केला असता देसाईगंज पोलीसांनी अवघ्या १२ तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणी न्यायालयाने आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
प्राप्त माहितीनुसार सोना चांदी कारागीर त्रेंबक गिरीधर भजने (३९)  रा. चोप हे काल २१ एप्रिल रोजी सायंकाळी ७ ते ७.३० वाजताच्या दरम्यान आपल्या चांदीची व बेन्टेक्स चे सामान बॅगमध्ये टाकून नेहमीप्रमाणे मोटारसायकलने शंकरपूर येथून चोप येथे आपल्या स्वगावी जात असताना तीन इसमांनी त्यांना थांबवून एकाने गाडीची चावी काढून दोघांनी बॅगमधील चांदीची व बेन्टेक्स चे सामान किंमत अंदाजे ४५ हजार रुपये जबरीने चोरी करण्याचा प्रयत्न केला व झकामकी करून पळून गेले. याबाबत त्रेंबक भजने यांनी देसाईगंज पोलीस ठाणे येथे तोंडी तक्रार दाखल केली. तोंडी तक्रारीच्या आधारे पोलीस ठाणे देसाईगंज येथे गुन्हा दाखल करून उपविभागीय पोलिस अधिकारी साहिल झरकर व पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे यांनी अवघ्या १२ तासात तिन्ही संशयित इसमांना अटक करून जेएमएफ सी कोर्ट देसाईगंज येथे हजर केले असता कोर्टाने आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे यांच्यासह पोलीस शिपाई श्रीकृष्ण जुवारे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here