चांदापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

101

The गडविश्व
गडचिरोली : शिवगर्जना सांस्कृतिक, कला, क्रिडा व बहुउद्देशीय मंडळ चांदापुर (रजि.नं.४९३/२००६) च्या वतीने चांदापुर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती व जन्मोत्सव सोहळा मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. शिवाजी महाराजांच्या जिवन चरित्रावर प्रकाश टाकण्यासाठी म्हणून प्रमुख मार्गदर्शक गोंडवाना विद्यापिठ गडचिरोलीचे सिनेट सदस्य सुनिलजी शेरकी यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणातून शिवाजी महाराजांचे विचार व जिजाऊ घराघरात निर्माण व्हावे असे सांगितले. त्याचबरोबर लक्ष्मण खोब्रागडे यांनी विदयार्थ्यांनी यश कसे संपादन करावे या विषयी मार्गदर्शन केले. त्याच प्रमाणे दिलीपभाऊ पाल, नवनित चिंचोलकर, रविभाऊ शेरकी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमात चांदापूर येथील नुकताच एम.बी.बी.एस. साठी निवड झालेल्या गौरव मुन्नाजी मर्लेवार याचे आई वडील सौ.वनिताताई व मुन्नाजी मर्लेवार यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सौ. वनिताताई मर्लेवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी सरपंचा सौ. सोनीताई देशमुख ,उपसरपंच अशोकराव मार्गनवार, सौ . वेणूताई चिंचोलकर,सौ.सुनिताताई कडूकार, खुशाल पा.शेरकी, विनायक पा.झरकर, ज्ञानदेव पा.अर्जूनकार (पो.पा.)सौ.रेखाताई चिंचोलकर अंगणवाडी सेविका,सौ.विध्याताई पोटे आशा वर्कर उपस्थित होते .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदकिशोर शेरकी यांनी केले तर सुत्रसंचालन अंकुश शेरकी व आभार वसंत पोटे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंकज निशाने, बंडू पोरटे, सुरेश देशमुख, देविदास देशमुख, मनोज शेरकी, दिलीप पोटे,धिरज पाल,अभिजित चिंचोलकर,रोशन पोरटे,जयदिश पोटे, कुणाल पोटे,अथर्व चुदरी शुभम देशमुख व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here