गाव पातळी शिबिरातून ५१ रुग्णांवर उपचार

266

– गाव संघटनेचा पुढाकार
The गडविश्व
गडचिरोली, २० डिसेंबर : गाव संघटनेच्या पुढाकाराने कमलापूर, कढोली व अमिर्झा येथे मुक्तीपथ तर्फे गाव पातळी व्यसन उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरातून एकूण ५१ रुग्णांवर उपचार करण्यात आला.
अहेरी तालुक्यातील कमलापूर येथील शिबिरात २२ रुग्णांनी उपचार घेतला. यशस्वीतेसाठी आशावर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सदस्य, गाव संघटनेच्या सदस्यांनी मदत केली. कुरखेडा तालुक्यातील कढोली येथील एक दिवसीय शिबिरात १७ रुग्णांनी नोंदणी केली व १६ रुग्णांनी पूर्ण वेळ उपचार घेतला. यावेळी रुग्णांचे समुपदेशन प्राजु गायकवाड तर केस हिस्ट्री प्रभाकर केळझळकर व कान्होपात्रा राऊत यांनी घेतली. रुग्णांची नोंदणी विनोद पांडे यांनी केली. विशेष म्हणजे, एका महिन्यात गावाकऱ्यांच्या मागणीनुसार हे दुसरे शिबीर आयोजित करण्यात आले. पहिल्या शिबिरातून २५ रुग्णांनी पूर्णवेळ उपचार घेतला होता. गडचिरोली तालुक्यातील अमिर्झा येथील शिबिरात १३ रुग्णांनी उपचार घेतला .यावेळी सरपंच सोनाली नागपुरे, तमुस अध्यक्ष सुजित आखाडे उपस्थित होते. रुग्णांचे समुपदेशन छत्रपती घवघवे यांनी केले तर नियोजन तालुका संघटक अमोल वाकुडकर यांनी केले.
(The Gadvishava) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (PSG) (Olivier Giroud) (Deepika Padukone FIFA) (Closing ceremony World Cup 2022) (Argentina vs France) (Muktipath) (Tom Cruise) (Sundar Pichai) (Redmi Note 12) (Gram Panchayat Election 2022 Maharashtra Result) (World Cup)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here