ठाणेगाव येथे भागवत सप्ताह निमित्त रक्तदान शिबिर : ३३ जणांनी केले रक्तदान

348

– स्वयं रक्तदाता जिल्हा समितीपुढाकार
The गडविश्व
ता. प्र / आरमोरी , २० डिसेंबर : तालुक्यातील ठाणेगाव (नवीन) येथे भागवत सप्ताह निमित्त स्वयं रक्तदाता जिल्हा समितीच्या मार्गर्शनाखाली १८ डिसेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये ३३ जणांनी रक्तदान केले.
रक्तदान शिबिरामध्ये भास्कर खरकाटे, शशिकांत मडावी, दुशांत कुकडकार, राजकुमार सर्पे, निखिल शास्त्रकार, सागर जुवारे, राकेश नारदेलवार, वामन चापले, महेश कुकडकर, अजय नारनवरे, श्रीकृष्ण, विशाल कोल्हे, साहिल शेंडे, प्रकाश मंडलवार, नितेश खरवडे, सुरज चापले, नितेश बनकर, प्रशांत भरणे, मंगल मडावी, रोषण उपरीकर, टीकाराम उपरीकर, उमेश बांगरे, निशिकांत लक्षणे, भारत चापले, प्रकाश लक्षणे, विकेश चापले, खुशाल ढोरे, सोपान मंडलवार, विशाल मंडलवार, प्रमोद जुवारे, सिकंदर नंदनधरे, देविदास लठ्ठे, निशिकांत नैताम यांनी स्वैच्छिक रक्तदान करून गरजु रुग्णांना रक्त उपलब्ध होण्यास मोलाचे सहकार्य केले.
रक्त संकलन करण्याकरिता जिल्हा रुग्णालय, गडचिरोली चे बि. टी. ओ. डॉ. अशोक तुमरेटी, निलेश सोनवणे, स्वप्निल चापले, कु. भारती रंधये, कु. पल्लवी मडावी, बंडू कुंभारे यांनी सहकार्य केले.
सदर रक्तदान शिबीर यशस्वी करण्यास पंकज चापले, कालिदास लक्षणे, पियुष चापले, गुरुदेव दुधबळे, यांनी पुढाकार घेतले. भागवत सप्ताह समिती, ठाणेगान (नविन) चे सर्व सदस्य आणि के. टी. किरणापुरे आरमोरी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
रक्तदान शिबिराचे नेतृत्व स्वयं रक्तदाता जिल्हा समितीचे उपाध्यक्ष निशिकांत नैताम यांनी केले. तसेच स्वयं रक्तदाता जिल्हा समिती अध्यक्ष चारुदत्त राऊत यांनी रक्तदात्यांच्या नातेाईकांनी रक्त उपलब्ध करून देण्याच्या पद्धतीबद्दल मार्गर्शन केले.

(The Gadvishava) (Gadchiroli News Updates) (PSG) (Olivier Giroud) (Deepika Padukone FIFA) (Closing ceremony World Cup 2022) (Argentina vs France) (Muktipath) (Blood donation camp on the occasion of Bhagwat Week at Thanegaon: 33 people donated blood)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here