– वनविभागात खळबळ, झिंगानूर गावात आढळली पत्रके
The गडविश्व
गडचिरोली, १२ नोव्हेंबर : जिल्ह्यात नक्षल्यांनी पुन्हा डोके वर काढत वनकर्मचाऱ्यांना आपल्या निशाण्यावर घेत सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर येथे नक्षल्यांची धमकीवजा पत्रके आढळल्यची घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे. सदर घटनेने वनविभात एकच खळबळ उडाली आहे.
नक्षल्यांनी वनविभागाला निशाण्यावर घेत पत्रकात म्हटले आहे की, “फॉरेस्ट वालो का दादागिरी बंद करो, फॉरेस्ट वाले गरीब जनता की जमीन को प्लानटेशन कर रहे है वो अत्याचार बंद करो, समझ बंद नही किया तो मौत की सजा मिलेगी ! ” भा.क.पा.माओवादी ” असे पत्रकात नमूद केले आहे.
एरवी नक्षल्यांद्वारे शासन, प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाच्या विरोधात आवाज उठवीत असतात मात्र आता वनविभागाला निशाण्यावर घेत धकमीवजा पत्रके टाकल्याने वनविभागातील वनकर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. सदर नक्षली पत्रके शुक्रवारी सकाळच्या सुमारास सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर गावातील आंबेडकर या मुख्य चौकापासून ते रुग्णालयापर्यंतच्या मार्गावर आढळून आल्याची माहिती आहे. पत्रके आढळून आल्याची माहिती प्राप्त होताच स्थानिक पोलिसांनी सदर पत्रके ताब्यात घेतली आहे. सदर पत्रके गावातील मुख्य चौकात आढळून आल्याने ग्रामस्थ दहशतीत आहेत. ©©
#gadchirolinews #forestgadchiroli #naxal #sironcha #zinganur #naxalpatrak













