गडचिरोली : प्रकल्प समन्वयक पदाकरिता आदिम जमातीमधील उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित

304

– समाजकार्य पदवी अथवा पदव्यूत्तर पदवीधारकास प्राधान्य
The गडविश्व
गडचिरोली : आदिम जमाती विकास कार्यक्रमांतर्गत आदिम जमाती कक्षाकरीता बाह्य स्रोतांद्वारे निवडण्यात आलेल्या युनिसेक (UNISEC) या संस्थेमार्फत मानधन स्वरूपातील नियुक्ती करीता प्रकल्प समन्वयक या पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. गडचिरोली प्रकल्पात येत असलेल्या गडचिरोली, चामोर्शी, धानोरा, कुरखेडा, कोरची, देसाईगंज व आरमोरी या 7 तालुक्यातील आदिम जमातीच्या उमेदवाराला यासाठी अर्ज करता येणार आहे. यामध्ये फक्त माडीया, कोलाम, कातकरी या जमातीच्या उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. प्रकल्प समन्वयक या पदासाठी पदसंख्या एक असून दरमाह मानधन 15 हजार रूपये निश्चित केले आहे.
या पदासाठी उमेदवार हा अदिम जमातीचा असणे आवश्यक आहे. त्याचे किमान शिक्षण पदवी किंवा पदव्यूत्तर पदवी असणे आवश्यक आहे. पदव्यूत्तर पदवी असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. एमएसडब्लू, बीएसडब्लू, सामाजिक शास्त्र किंवा तत्सम सामाजिक कार्यक्रम अभ्यासक्रम असणा-यांना प्राधान्य असणार आहे. वंचित समाजाच्या विकासासाठी काम केल्याचा 1 ते 2 वर्षाचा अनुभव आवश्यक. संगणक हातळण्याचे कौशल्य असणेही उमेदवारास आवश्यक आहे.
यासाठी पात्र उमेदवारांनी आपले अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली कार्यलय, एलआयसी चौकाजवळ, सोनापूर कॉम्प्लेक्स, गडचिरोली-442605 येथे दि.21 फेब्रुवारी 2022 पर्यंत सादर करावेत असे आवाहन प्रकल्प अधिकारी, आशिष येरेकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here