गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन दुर्गम भागातील नागरिकांचा महामेळावा संपन्न

156

–  गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांचे प्रमुख उपस्थिती

The गडविश्व
गडचिरोली : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्हयात उद्योगधंदयाचा अभाव असल्यामुळे बेरोजगारांची संख्या मोठया प्रमाणात आहे. गडचिरोली जिल्हयातील युवक/युवतीना रोजगार प्राप्त व्हावा व त्यातुनच त्यांची आर्थिक समृध्दी व्हावी या हेतुने उदयास आलेल्या पोलीस दादालोरा खिड़किच्या माध्यमातुन गडचिरोली पोलीस दल व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापण यंत्रणा (आत्मा), गडचिरोली, AAIMS Protection Service Pvt Lmt Hyderabad, BOL STAR RSETI Gadchiroli, ॲक्सिस बैंक शाखा, गडचिरोली, आदर्शमित्र मंडळ पुणे व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र अंमलबजावणी संवेदना प्रकल्प हरंगुळ (बु) लातुर यांचे संयुक्त विद्यमाने गडचिरोली पोलीस संकुल परीसरातील ‘एकलव्य सभागृह येथे महामेळावा आज २७ जानेवारी २०२२ रोजी पार पडला.
सदर महामेळाव्यात गडचिरोली जिल्हयातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील युवक-युवतींनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली महामेळाव्यात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बीओआय स्टार आरसेटी च्या माध्यमातून शिवणकलेचे प्रशिक्षण दिलेल्या ३५ युवतींना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापण यंत्रणा व कृषी विज्ञान केंद्र, सोनापुर यांचे समन्वयातून २४ ते २७ जानेवारी २०२२ या कालावधीत बदक पालनाचे प्रशिक्षण दिलेल्या ५१ प्रशिक्षणार्थ्यांना प्रत्येकी १० बदकाची पिल्ले, बदक पालन करण्यास उपयोगात येणारे भाडे, खादय वाटप करण्यात आले. AAIMS Protection Service Pvt. Lmt Hyderabad यांचे माध्यमातुन सुरक्षा रक्षकाची नोकरी मिळालेल्या ६० युवकांना नियुक्ती प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. आदर्शमित्र मंडळ पुणे व जिल्हा दिव्यांग पुनर्वसनकेंद्र अंमलबजावणी संवेदना प्रकल्प हरंगुळ (बु), लातुर यांचे माध्यमातुन २५ दिव्यांग व्यक्तींना व्हिल चेअर वाटप करण्यात आल्या. ॲक्सिस बँक शाखा, गडचिरोली यांचे माध्यमातून व्हिएलई चे प्रशिक्षण घेतलेल्या ४६ युवकांना व्हिएलई प्रमाणपत्र व कॉमन सव्हिस सेंटर (सिएससी) प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. ३८ आत्मसमर्पित नक्षल कुटुंबियांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे आरोग्यकार्ड वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे ३ आत्मसमर्पित नक्षल कुटुंबियांना घरकुल प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
गडचिरोली पोलीस प्रशासनाद्वारे आजपर्यंत पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून सुरक्षा रक्षक ४१३, नर्सिंग असिस्टंट ११४३, हॉस्पीटलोटो २९६ ऑटोमोबाईल २५४, इलेक्ट्रीशिअन १४०, प्लम्बांग २७. वेल्डिंग २३, जनरल ड्युटी असिस्टंट ३८, फोल्ड ऑफीसर ११ तसेच व्हीएलई ४५ असे एकुण २४०० युवक/युवतींना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे बीओआय आरसेटी व कृषी विज्ञान केंद्र, गडचिरोली यांचे सहकार्याने ब्युटीपार्लर ७०, मत्स्यपालन ६०, कुक्कुटपालन ३४३, बदक पालन १०१, शेळीपालन ६७, लेडीज टेलर ३५, फोटोग्रॉफी ३५, टू व्हिलर दुरुस्ती प्रशिक्षण ३४, फास्ट फुड ३५, पापड लोणचे ३०, मधुमक्षिका पालन ३२, भाजीपाला लागवड ३२६, दू/फोर व्हीलर प्रशिक्षण ३७० य पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण ५८० अशा प्रकारे एकुण २११८ युवक/युवतींना स्वयंरोजगारांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
सदर महामेळावा गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई, गडचिरोली परीक्षेत्र पोलीस उप महानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधिक्षक समीर शेख, अपर पोलीस अधिक्षक (अभिवान) सोमय मुंडे, अहेरी चे अपर पोलीस अधिक्षक अनुज तारे , आत्मा गडचिरोलीचे प्रकल्प संचालक संदीप कन्हाळे, बीओआय स्टार आरसेटी गडचिरोलीचे संचालक चेतन वेदय, राजीवकुमार सर्कल हेड नागपुर विभाग, क्लस्टर हेड अजित श्रीवास्तव, ॲक्सीस बैंक शाखा गडचिरोलो ब्रँच मैनेजर राकेश बल्लालबार, AAIMS Protection Service Pvt. Lmt Hyderabad संचालक मल्लेश यादव , जिल्हा दिव्यांग पुनर्वसन अमलबजावणी संवेदना प्रकल्प हरगुळ (बु) लातुरचे सुरेश पाटील यांचे उपस्थितीत घेण्यात आला. सदर महामेळावा यशस्वी होण्याकरिता गडचिरोली जिल्हयातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच सर्व प्रभारी अधिकारी पोस्टे/उपपोस्टे/पोमके त्याचप्रमाणे नागरीकृतीशाखेतील प्रभारी अधिकारी सपोनि महादेव शेलार तसेच पोलीस अमलदारांनी विशेष परिश्राम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here