गडचिरोली जिल्ह्यात सामुदायिक हिवताप सर्वेक्षण मोहिमेला सुरुवात

312

– १७ फेब्रुवारी ते ३ मार्च पर्यंत मोहिम

The गडविश्व
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा हा आदिवासीबहूल, नक्षलग्रस्त व हिवताप संवेदनशिल आहे. या जिल्ह्यात 12 तालुके असून संबंधित तालुक्यामधील एटापल्ली, भामरागड, धानोरा, कोरची, अहेरी, हे तालुके अतिशय दुर्गम कार्यक्षेत्राचे आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी व दुर्गम भागातील नागरिक हे जंगलात असलेल्या छोटया- छोटया गावामध्ये राहतात. यातील कित्येक गावाची लोकसंख्या फक्त 50 ते 60 असल्यामुळे गावात हिवतापाचे जरी 1 किंवा 2 रुग्ण असले तरी हिवतापाचा इन्डीकेटर हा API हा 20 व त्यापेक्षा जास्त आढळतो. तसेच मान्सून कालावधीत 30 टक्के व त्यापेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे हिवतापाबाबत विचार केले असता संपूर्ण महाराष्ट्रातील पी.एफ मलेरीया 70 ते 75 टक्के रुग्ण हे फक्त गडचिरोली जिल्ह्यातील असतात. त्यामुळे जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती अतिविशेष असल्यामुळे हिवताप निर्मुलन करण्याकरीता विशेष उपाययोजनांची आवश्यकता आहे.
याकरीता शासनाने सन 2021-22 या आर्थिक वर्षाच्या पी.आय.पी मध्ये गडचिरोली जिल्ह्यात हिवतापाचे सक्रीय संक्रमण होत असल्यामुळे हिवतापाचा समुळ नायनाट करण्यासाठी विशेष शोधमोहिम राबवून समस्याग्रस्त भागाचा शोध घेऊन तेथील सर्व लोकसंख्येचे सर्वेक्षण माहे फेब्रुवारी- मार्च महिन्यात घेण्याचे मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत.
विशेष हिवताप सर्वेक्षण मोहिम ही जंतूभार 10 व त्यापेक्षा जास्त प्रा.आ.केंद्रात राबविण्यात जास्त असलेल्या प्रा.आ. केंद्रात राबविण्यात येणार आहे. यासाठी 5 तालुके, 15 प्रा.आ.केंद्र, 111 उपकेंद्र व 659 गावाची निवड करण्यात आली असून 659 गावातील आशावर्कर व 91 क्षेत्र कर्मचारी करुन सर्वेक्षणाचे काम करण्यात येणार आहे. या मोहिमेत 220796 लोकांचे रक्तनमुने व 14044 लोकांचे आर.डी.के. द्वारा तपासणी होईल. हिवताप दुषीत रुग्णांना प्रा.आ. केंद्रातील आरोग्य यंत्रणेमार्फत उपचार करण्यात येईल. त्याअनुषंगाने आरोग्य विभाग व जिल्हा हिवताप कार्यालयाच्यावतीने दिनांक 17.02.2022 ते 20.03.2022 या कालावधीत हिवताप शोध मोहिम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेचे उद्घाटन आरोग्य सभापती जि.प.गडचिरोली मनोहर पाटील पोरेटी यांचे हस्ते करण्यात आले. या उद्घाटन सोहळयात ज्येष्ठ जि.प. सदस्य रामभाऊ मेश्राम, जि.प. सदस्य श्रीमती रुपालीताई पंदलवार, डॉ. दावल साळवे जिल्हा आरोग्य अधिकारी, गडचिरोली, डॉ. संतोषकुमार जठार अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. समीर बन्सोडे माता व बाल संगोपण अधिकारी, डॉ. विनोद मशाखेत्री जिल्हा सर्वेक्षण अधिकारी, व डॉ. कुणाल मोडक जिल्हा हितवाप अधिकारी व सर्व तालुका आरोग्य अधिकारी तसेच कालीदास राऊत, अशोक पवार व राजेश कार्लेकर हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here