गडचिरोली जिल्हा दारूमुक्ती संघटना व्यापक व सबळ बनणार

258

The गडविश्व
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा दारुमुक्ती संघटनेची स्थापना १९८७ साली होऊन उभ्या झालेल्या आंदोलनातून १९९३ साली दारूबंदी लागू झाली. शनिवार २५ फेब्रुवारी गडचिरोली जिल्हा दारूबंदी संघटनेची बैठक सर्च शोधग्राम येथे उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली. कोरोनाच्या समस्येमुळे मागील वर्षात बैठक न होऊ शकल्याने या बैठकीत वरील विविध मुद्द्यावर सखोल चर्चा करण्यात आली. गडचिरोली जिल्हा दारूबंदीची सद्यस्थिती,अडचणी, उपाय तसेच राज्य सरकारच्या किराणा दुकानात वाईन विक्री बाबतच्या निर्णया विरोधात निवेदन पारित करून शासनाला पाठवणे, जिल्हादारूबंदी संघटना अधिक प्रबळ व सक्रीय करण्याहेतू रणनीती व निर्णय घेणे, या विविध हेतूने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
सध्या १३०० गावात मुक्तीपथ गाव संघटना स्थापित असून ६३६ गावात अवैध दारूविक्री देखील बंद आहे, ५४७ गावात तंबाखू विक्री बंद आहे, गाव संघटनेच्या महिला सतर्क राहून बेकायदेशीर दारू बंद करीत आहेत ही माहिती सांगण्यात आली. पण शहरी भागातील व सीमे पलीकडून येणारी अवैध दारू तसेच आदिवासी गावात मोहाची दारू किंवा ताडी या समस्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवल्याने गडचिरोलीत दारू येण्याचा धोका आहे. जिल्हा दारूबंदी संघटना मजबूत करण्याहेतू, तालुका पातळीला, आदिवासी भागात इलाखा व ग्रामसभा पातळीला व गैरआदिवासी तालुक्यात गांव पातळीला दारूबंदी संघटना अधिक प्रबळ करावी, महिला व युवक संघटन वाढवणे व सक्रीय सदस्य अधिक संख्येत जोडण्याचा सामुहिक व महत्वाचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.यासह, अवैध दारू विक्रेत्यांवर प्रशासनाद्वारा कारवाई, महिला ग्रामसभा, इलाका सभा, मुक्तिपथ गांवसंघटना, ग्रा.प. समित्या द्वारा निर्णय व कृती इत्यादी विविध मुद्यांवर सर्व सदस्यांनी सहभाग घेत चर्चा केली व सर्वानुमते निर्णय पारित केले.
बैठकीला संघटनेचे अध्यक्ष डॉ. अभय बंग, उपाध्यक्ष देवाजी तोफा, सल्लागार माजी आमदार हिरामणजी वरखेडे, कार्यकारिणी सदस्य डॉ. सतीश गोगुलवार, डॉ. शिवनाथ कुंभारे, डॉ. सूर्यप्रकाश गभणे, विलास निंबोरकर, पंडित पुडके, मुक्तिपथचे सल्लागार डॉ. मयूर गुप्ता, उपसंचालक संतोष सावळकर व १२ ही तालुक्याचे तालुका संघटक, सर्चचे सहसंचालक डॉ. आनंद बंग, तुषार खोरगडे, यावेळी हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here