गडचिरोली जिल्हयातील प्रतिक्षा सोनी मराठी टिव्ही वरील “जिवाची होतीया काहिली” मध्ये मुख्य भुमिकेत

3302

 – जिल्हयाच्या शिरपेचात मानाचा तुरा

The गडविश्व
गडचिरोली, २० जुलै : जिल्हा अतिदुर्गम, वनाच्छादित, नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो मात्र आता जिल्ह्याला नवी ओळख मिळाली असून जिल्ह्यातील प्रतिक्षा शिवणकर (Pratiksha Shivankar) ही सोनी मराठी टिव्ही चॅनल वरील “जिवाची होतीया काहिली” (Jivachi Hotiya Kahili ) या मालीकेत मुख्य नायिकेच्या भूमिकेत दिसून येत आहे. म्हणून निच्छीतच गडचिरोली (Gadchiroli) जिल्हयाच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला आहे.
सोनी मराठी (Sony Marathi) टिव्ही चॅनल वर नुकतीच १८ जुलै २०२२ पासून “जिवाची होतीया काहिली” (Jivachi Hotiya Kahili ) ही नवी मालीका सुरू झाली आहे. सोमवार ते शनिवार सायंकाळी ७.३० वाजता ही मालिका असते. या मालीकेत गडचिरोलीची प्रतिक्षा शिवणकर ही मुख्य नायिकेच्या भूमिकेत बघायला मिळत आहे. प्रतिचा ही मुळची गडचिरोली येथील असून तिचे शिक्षण चामोर्शी येथील शिवाजी हायस्कुल येथे झाले. शिवाजी हायस्कुलमध्ये शिक्षण घेताना विविध सांस्कृतीक कार्यक्रमात ती भाग घेत होती. त्यात ती पारंगत होती. पुढील शिक्षणसाठी ती पुण्याला गेली.तिचे वडील सुनिल शिवणकर गडचिरोली शहरानजीकच्या खरपुंडी येथील जि.प. शाळेत शिक्षक व आई भारती शिवणकर हया दिभना येथील जि.प.शाळेत मुख्याध्यापीका आहेत.

प्रतिक्षाने प्रशांत दामले (Prashant Damle) यांच्या फॅन्स फॉउंडेशन निर्मित “एका लग्नाची पुढची  गोष्ट” ( Eka Lagnachi Pudhchi Goshta) या व्यावसायिक नाटकातून नाटयसृष्टीत पदार्पण केले होते. त्या नाटकाचा नुकताच ५०० वा नाटयप्रयोगही झाल्याचे कळते. प्रतिक्षाने “कॉलेज डायरी” (College Diary (2019) ) या नावाचा सिनेमा देखील केला आहे. तसेच लॉकडॉउननंतर “कॉमेडी बिमेडी” (Comedy Beemedy) नावाचा शो देखील केला आहे.
प्रतिक्षाला एकदा तरी ऑडिशन देण्याची इच्छा होती. व तिची इच्छा प्रशांत दामले (Prashant Damle) यांच्या “टी स्कूल थिएटर अकादमी” मध्ये पुर्ण झाली. तिची निवड तीथेे झाल्यानंतर तिला नृत्य व अभिनयाचे धडे मिळाले. तसेच तिचा अभिनय बघून तिला अकादमी तर्फे स्कॉलरशिप मिळाली. त्यामुळे दोन वर्षे तिला विनामुल्य प्रशिक्षण मिळाले त्यानंतर प्रशांत दामले यांच्याच “एका लग्नाची पुढची  गोष्ट” ( Eka Lagnachi Pudhchi Goshta) या नाटकासाठी तिला ऑडीशनला बोलावण्यात आले. त्यासाठी निवड झाल्यानंतर प्रतिक्षाचा आत्मविश्वास व्दिगुणित होत गेला. व आज ती सोनी मराठी टिव्ही वरील “जिवाची होतीया काहिली” (Jivachi Hotiya Kahili ) या मालीकेत मुख्य नायिकेच्या भूमिकेत दिसत आहे. यात ती कानडी मुलीच्या भुमिकेत असून तिचे एका मराठी मुलाशी प्रेम जुळते. त्यामुळे दोन वेगळया संस्कृतीचा मिलाफ या मालिकेत बघायला मिळणार आहे. प्रतिक्षाची ही पहिलीच मालीका असल्याने ती खुपच उत्साही आहे.

“जिवाची होतीया काहिली” सोनी मराठी टिव्ही चॅनल वर सोमवार ते शनिवार सायंकाळी ७.३० वाजता

©

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here