गडचिरोली : चारचाकी वाहनाच्या अपघातात तिघेजण जखमी

276

The गडविश्व
गडचिरोली : शहरात भरधाव कारने रस्त्याच्या कडेला उभ्या खासगी बसला धडक दिल्याने अपघात झाल्याची घटना गुरुवारी रात्रौ ११ वाजताच्या सुमारास चंद्रपूर मार्गावरील कारगिल चौकात घडली. या अपघातात कारमधील तीन युवक जखमी झाले असून कारसह खासगी बसचे नुकसान झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, एमएच 29 आर 3121 क्रमांकाच्या चारचाकी वाहनात तीन युवक चंद्रपूर मार्गे गडचिरोलीकडे येत होते. दरम्यान कारगिल चौकानजीक रस्त्याच्या बाजूला उभ्या एका खासगी बसला कारने जबर धडक दिली. या अपघातात कारचा पुढील भाग पूर्णतः क्षतिग्रस्त झाला आहे. तसेच खासगी बसचेही नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक घटनास्थळी पोहचले. यावेळी जखमी युवक स्वतःच उपचारार्थ रुग्णालयात दाखल झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here