क्षयमूक्त जिल्ह्यासाठी कर्मचाऱ्यांनी रुग्णापर्यंत पोहचण्याचा संकल्प करावा : डॉ. रुडे

369

-जिल्हा सामान्य रुग्णालयात जागतिक क्षयरोग दिन साजरा
The गडविश्व
गडचिरोली : जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये जागतिक क्षयरोग दिन 24 मार्च 2022 ला साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. अनिल रुडे जिल्हा शल्यचिकित्सक जि.सा.रु., कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. साळुंखे अतिरीक्त जिल्हा शल्यचिकित्सक जि.सा.रु., डॉ. दावल साळवे जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. गडचिरोली, डॉ. नागदेवते, डॉ. मनिष मेश्राम, डॉ. सचिन हेमके जिल्हा क्षयरोग अधिकारी, डॉ. प्रफुल गोरे वैद्यकिय अधिकारी जिल्हा क्षयरोग केंद्र गडचिरोली आदि उपस्थित होते.
24 मार्च जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधुन जिल्हयातील 13 क्षयरोग पथकाअंतर्गत विविध जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करुन शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली.
जागतिक क्षयरोग दिनाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सचिन हेमके यांनी केले. त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेमार्फत या वर्षी घोषीत करण्यात आलेल्या “टीबी संपविण्यासाठी गुंतवणुक करा व जिव वाचवा” या घोषवाक्याचे महत्व पटवुन दिले तसेच देशाला क्षयमुक्त करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी रुग्णापर्यंत पोहचण्याचा संकल्प करावा तसेच या बाबत जनजागृती करावी असे आवाहन केले. त्याच बरोबर डॉ. अनिल रुडे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये क्षयरोग कर्मचारी यांच्या महाराष्ट्रातुन गडचिरोली जिल्हयाचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल गौरव केला व क्षयरोगाविषयची जनजागृती ग्रामिण भागातील तळागळातील लोकांपर्यंत करावी असे आवाहन केले.
जागतिक क्षयरोग दिनानिमित्य जिल्हा नियोजन समिती सभागृह गडचिरोली येथे आयोजित जिल्हा स्तरीय आशा व गटप्रवर्तक पुरस्कार सोहळयादरम्यान क्षयरोगावर मार्गदर्शन करुन कुमार आशिर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते क्षयरोग दिनदर्शिका व इतर जनजागृती साहित्यांचे लोकार्पन करण्यात आले. सदर कार्यक्रमादरम्यान कुमार आशिर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आशा स्वयंसेविकांनी क्षयरोग कार्यक्रमात आपले मोलाचे योगदान देऊन क्षयमुक्तिसाठी कार्य करीत राहावे असे आवाहन केले.
जागतिक क्षयरोग दिनाच्या कार्यक्रमाचे संचालन गणेश खडसे व आभार ज्ञानदिप गलबले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जिल्हा क्षयरोग कार्यालयातील अनिल चव्हान, राहुल रायपुरे, मनिष बोदेले, विनोद काळबांधे, विलास भैसारे, शरद गिऱ्हेपुंजे, प्रसेनजीत कोटांगले, लता येवले, वंदना राऊत, लक्ष्मी नागेश्वर आदिंनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here