अज्ञात चोरट्यांनी लांबवीले खांबासह सोलर प्लेट

362

– कोरची पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

The गडविश्व
गडचिरोली, ८ जुलै : जिल्हयातील शेवटच्या टोकावर वसलेल्या कोरची नगर पंचायत अंतर्गत नवरगावकडे जाणाऱ्या मार्गावर लावण्यात आलेले सौर उर्जा लाईटचे तिन खांब अज्ञातांनी पळविल्याची घटना उघकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरूध्द कोरची पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, नगर पंचायत कोरची अंतर्गत नवरगाव जाणाऱ्या मार्गावर व फाटयावर सौर उर्जा सोलर लाईटचे खांब लावण्यात आले होते. दरम्यान ४ जुलै रोजी सदर लाईट व खांब नेहमी प्रमाणे सुरू होते. मात्र, ५ जुलै रोजी सदर खांब, लाईट, बॅटरी नसल्याची बाब उघडकीस आली. माहितीच्या आधारे नगर पंचायतिचे प्रशासकिय अधिकारी हाके यांनी घटनास्थळी भेट देवून पाहनी केली असता, सदर खांब दिसून आले नाही व आजूबाजूला शोध घेतला असता कोरची बाहेरील तलावाजवळ, जंगलात लोखंडी खांब दिसून आले. अज्ञात चोरटयांनी सोलर प्लेट ३ नग अंदाजे किंमत १८ हजार रूपये, १२ वोल्ट बॅटरी ३ नग अंदाजे किंमत १२ हजार रूपये, १४ वॅट एलईडी बल ३ नग अंदाचे किंमत १५ हजार रूपये, लोखंडी नट बोल्ट व एगंल अंदाजे किंमत ५०० रूपये असा एकुण ४५ हजार ५०० रूपयांचा माल लांबविला. या प्रकरणी कोरची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीसांनी अज्ञााताविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास कोरची पोलीस करित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here