२८ जुलै ला जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघासाठी आरक्षण सोडत

397

– आरक्षणाचे प्रारुप २९ जुलै रोजी प्रसिध्द करण्यात येणार

The गडविश्व
वर्धा, २५ जुलै : जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (स्त्रियांच्या आरक्षणासह) राखून ठेवावयाच्या जागा आणि उर्वरित स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत. त्याकरिता आरक्षण सोडत काढणे तसेच आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्दी करून त्यावर हरकती व सुचना सादर करण्यासाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार २८ जुलै रोजी आरक्षण सोडत काढली जाणार आहेत.
जिल्ह्यातील वर्घा जिल्हा परिषद मतदारसंघासाठी आरक्षण सोडत जिल्हा परिषद सभागृह, वर्धा व हिंगणघाट पंचायत समितीसाठी सकाळी ११ वाजता काढली जातील. तर उर्वरीत पंचायत समितीसाठी त्या-त्या तालुक्याच्या ठिकाणी दुपारी ३ वाजता सोडत काढली जातील. त्यानुसार आष्टी पंचायत समितीची आरक्षण सोडत तहसिल कार्यालय सभागृह, आष्टी, कारंजाची तहसिल कार्यालय सभागृह, कारंजा, आर्वीची पंचायत समिती सभागृह आर्वी, सेलुची पंचायत समिती सभागृह, सेलू, वर्धाची सामाजिक न्याय भवन, वर्धा, समुद्रपूरची तहसिल कार्यालय सभागृह, समुद्रपूर, देवळीची तहसिल कार्यालय पहिला माळा येथील सभागृह, देवळी, हिंगणघाटसाठी तहसिल कार्यालय सभागृह, हिंगणघाट येथे सोडत काढली जातील. हिंगणघाटची सोडत सकाळी ११ वाजता तर इतर सर्व पंचायत समितीची सोडत दुपारी ३ वाजता काढली जाईल.
आरक्षणाचे प्रारुप २९ जुलै रोजी प्रसिध्द करण्यात येयील. आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी व संबंधित तहसिलदार यांच्याकडे हरकती व सूचना २९ जुलै ते २ ऑगस्ट या दरम्यान स्विकारल्या जातील. जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीतील ज्या रहिवाशांना सदर आरक्षण सोडतीच्या सभेस हजर राहण्याची इच्छा आहे, ते संबंधित ठिकाणी हजर राहू शकतात, असे जिल्हाधिकारी वर्धा यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here