२६ जून ला माना समाजाची जातवैधता प्रमाणपत्र संबंधी बैठक

856

– समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
The गडविश्व
चिमूर : माना समाजाच्या खारीज असलेल्या तसेच अवैध झालेल्या जातवैधता प्रकरणावर तोडगा काढण्याकरिता २६ जून २०२२ रोजी डॉ.रमेशकुमार गजबे शिक्षा संकुल, पुयारदंड भिसी ता. चिमूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर बैठकीत समाजातील ज्या विद्यार्थ्यांची व समाज बांधवांची जातवैधता प्रकरने खारीज किंवा अवैध झाली आहेत यावर तोडगा काढण्याकरिता उपायजोजना करून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी ज्यांची जातवैधता प्रकरणे खारीज किंवा अवैध झाली आहेत त्या समाजबांधवांनी संबंधित कागदपत्रे घेऊन सदर बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना महाराष्ट्र च्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहिती करीता 8657179777, 9049244567, 7666132895 या क्रमांकावर संपर्क करावे असे सुद्धा कळविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here