The गडविश्व
गडचिरोली : कोरची तालुक्यातील बेतकाठी शेतशिवारात सुरू असलेली हातभट्टी व २५ हजारांचा मोहफुलाचा सडवा गाव संघटनेच्या पुढाकारातून मुक्तीपथ तालुका चमूने नष्ट केल्याची कृती १४ एप्रिल रोजी केली.
बेतकाठी शेतशिवारात मोहसडवा टाकून गाव संघटनेला न जुमानता गावातील एक दारूविक्रेता अवैध व्यवसाय करित होता. यामुळे परिसरातील गावातील मद्यपी त्या ठिकाणी दारू पिण्यासाठी येत होते. यामुळे गावात भांडण, तंटे निर्माण होत होते . संबंधित विक्रेत्यांवर पोलिस विभागाने सुद्धा वारंवार धाड टाकून कारवाई केली आहे. मात्र, त्याचा अवैध व्यवसाय सुरूच होता.दरम्यान दारू गाळण्यासाठी शेतशिवारात मोहफुलाचा सडवा टाकला असल्याची माहिती मिळताच गाव संघटनेच्या पुढाकारातून मुक्तीपथ तालुका चमूने शेतशिवारात शोधमोहीम राबवली असता पाच ठिकाणी एकूण 25 हजारांचा मोहफुलाचा सडवा व साहित्य मिळून आले. यावेळी संपूर्ण मुद्देमाल नष्ट करण्यात आला.