हिरापुर ग्रामपंचायतच्या सरपंचाच्या विरोधात ग्रामस्थांचे धरणे आंदोलन

386

– विधवा महिला,परित्यक्तानां घरकुल पासून डावलणाऱ्या तसेच मजुरांची मजुरी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या सरपंचास पदमुक्त करण्याची मागणी
– “हिरापुर ग्रामस्थांचा सरपंच हटाव चा नारा”

The गडविश्व
सावली, २९ जुलै : पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या हिरापुर ग्रामपंचायत मध्ये घरकुल च्या “ड” यादीत मोठी हेराफेरी करुन चक्क विधवा, आदीवासी, परीतक्त्या महिलांना.घरकुल पासुन.वंचित ठेवणाऱ्या व आपल्या मर्जीतील.लोकांचे घरकुल यादीत नावे टाकणाऱ्या, तसेच हिरापुर ग्रामपंचायत अंतर्गत जून्या विहिरींची दुरुस्ती व.फ्लटफार्म बांधकाम, गावातील ग्रामस्थांना मजुरी मिळावी म्हणून १० ते १५ मजुर कामाला लावले पण त्याना दिड वर्षाचा कालावधी होऊन केलेल्या कामाची मजुरी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या हिटलर शाही पद्धतीने काम व पदाचा गैरवापर करणाऱ्या हिरापुर येथील सरपंचा प्रीती नितीन गोहणे यांना पदमुक्त करा यासाठी गुरुवार २८ जुलै रोजी ग्रामपंचायत हिरापुर समोर ग्रामवासियांनी धरणे आंदोलन केले.
हिरापुर ग्रामपंचायत अंतर्गत पंतप्रधान आवास योजना ‘ड’ यादीमध्ये विधवा महिलांना सर्वप्रथम” ड “यादीत प्राधान्य दिले जाते परंतु विधवा महिलांना घरकुल चा लाभ न देता आपल्या मनमानीने काम करुन आपल्या नातेवाईकांना घरकुलांचा लाभ दिला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे, पंचायत समिति कार्यालयातून घरकुल यादी ग्रामपंचायतीत पाठविण्यात आले, यादीचे वाचन ग्रामसभेत झाले, योग्य व गरजु व्यक्तीची निवड करण्यात आली परंतु सरपंच यांनी ती निवड झालेली यादी पंचायत समितीला न पाठवता आपल्या मर्जीने दुसरी यादी बनवुन आपल्याच मर्जीतील व नातेवाईक यांना घरकुल दिल्याचे उघडकीस आले असा आरोप ग्रामस्थांनी धरणे आंदोलनात सरपंचावर केला आहे. त्याच प्रमाणे गावातील विहिरींची दुरुस्ती व फ्लटफार्म बांधकाम ग्रामपंचायत अंतगर्त करण्यात आले, गावातील मजुरांना काम मिळावे म्हणून गावातील मजुर १० ते १५ कामावर लावण्यात आले, परंतु दिड वर्षे लोटूनही त्यांची मजुरी देण्यास ग्रामपंचायत कमेटी टाळाटाळ करीत आहे, कामे झाली पण ग्रामपंचायत निवडणूक लागली आणि ग्रामपंचायत ची कामे प्रशासकाकडे गेलीत, प्रशासकांच्या काळात सुध्दा मजुरी मिळाली नाही, नवीन ग्रामपंचायत कमेटीकडे सुध्दा विचारणी केली असता सदर कामे हि आमच्या काळातील नाही याबद्दल आम्हाला काही माहिती नाही असे ग्रामपंचायत कमेटीचे म्हणणे आहे त्यामुळे आता पर्यंत मजुरांच्या मजुरीचा प्रश्न अंधातरीच होता.
त्यामुळे या सर्व विषयाला अनुसरून ग्रामवासियांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन देण्यात आले व हिटलर शाही, हुकुमशाही पध्दतीने काम करणाऱ्या, संविधानाला न मानणाऱ्या सरपंचाचा जाहीर निषेध करुन सरपंच हटवा असे नारे देण्यात आले.अनेक महिन्यापासून सदर बाबत अनेकदा निवेदने देण्यात आलीत मात्र गट विकास अधिकारी सुनीता मरासकोल्हे यांनी चौकशीअंती कारवाई करू असे वारंवार सांगितले मात्र आजपर्यंत कुठलीही चौकशीसाठी अधिकारी नेमला नाही आणि कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळे पाणी कुठे मुरत आहे ? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला असून सदर चौकशी जिल्हास्तरावरून करण्यात यावी असे सदर प्रतिनिधी जवळ धरणे आंदोलनाला भेट दिली असता सांगितले. तसेच दैनिक सकाळ ला सुद्धा बातमी प्रकाशित करण्यात आली त्यावेळेस सुद्धा गटविकास अधिकारी यांनी आपल्या प्रतिक्रियेत लवकरच कारवाई करण्यात येईल असे सांगितले मात्र कारवाई तर सोडा आज धरणे आंदोलनाला साधी भेट देऊ शकले नसल्याने ग्रामस्थांकडून रोष व्यक्त केला जात आहे.

घरकुल यादीत फेरबदल करण्यात आला तसेच मजुरांची मजुरी देण्यास ग्रामपंचायत कमेटी टाळाटाळ करीत आहेत .
टी. एम.शेडमाके
सचिव ग्रामपंचायत हिरापूर

धरणे आंदोलनाला गटविकास अधिकारी यांनी पाठ फिरवली त्यामुळे सरपंच यांना आशीर्वाद नसेल ना ? त्यामुळे जिल्हास्तरावरून चौकशी करण्यात येऊन दोषींवर कारवाई करावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here