The गडविश्व
चामोर्शी : महामानव, बोधिसत्व, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती सोनापूर येथे उत्साहात साजरी करण्यात आली.
आंबेडकर चौक येथे ध्वजारोहण व द्विप प्रज्वलित करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. तसेच जिल्हा परिषद शाळा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय आणि ग्रामपंचायत सोनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने वाचनालयात जयंती साजरी करण्यात आली.याप्रसंगी अध्यक्षस्थानी सरपंचा सौ. गोपिकाताई टेकाम, उपसरपंच शेषराव कोहळे, समारोह समिती अध्यक्ष सुखदेव उंदिरवाडे, शालीकजी कुरखेडे, सदस्य उत्तम कोवे, शिक्षक सोहन महोरकर, नरेश उंदिरवाडे, मनोज सहारे, अतुल उंदिरवाडे, बेबीबाई सोयाम, देवराव उंदिरवाडे, अर्चना माहोरकर, हरीश पिपरे, प्रशांत टेकाम, सुरज मडावी, रोशन मोगरकर, तथा समस्त युवक, गावकरी उपस्थित होते. संचालन रणजित उंदिरवाडे तर आभार आशिष चलाख यांनी मानले.