The गडविश्व
सावली : तालुक्यातील जांब रैयतवारी येथे स्वराज्य रक्षक मंडळ रैयतवारी यांच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी प्रा. प्रबोधनकार चेतन ठाकरे यांचे भारुळाच कार्यक्रम घेण्यात आला. त्यांनी सामाजिक जीवनावर उत्तम प्रकारे भारुडाच्या माध्यमातून प्रकाश टाकला. तसेच आजची समाजाची विचारसरणी, सामाजिक जीवनातील चालीरीती, लोकांची मानसिकता याविषयी भरपूर दाखले देऊन सामाजिक प्रबोधन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ वासेकार यांनी केले तर जि. प. प्राथमिक शाळा रैयतवारीचे शिक्षक कांबळे यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जि. प. प्राथमिक शाळा चक पेटगावचे शिक्षक किनेकर हे होते तर कार्यक्रमाला जाम रै चे पोलीस पाटील अशोक पा. चौधरी, सूर्यभान पा. मडावी, रावजी पा. सोनटक्के, भास्कर पा. ठाकूर, नानाजी पा. भांडेकर तसेच गावातील प्रतिष्टीत नागरिक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमामध्ये रेवण घेर, भागवत भूरसे, धनश्री नैताम, जानवी धोटे, चेतन सोनटक्के यांनी शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्याकरिता स्वराज्य रक्षक मंडळाच्या सर्व सभासदांनी उत्तम प्रकारे नियोजन केले होते. या कार्यक्रमारीत गावातील लहान मोठ्या सर्व लोकांची हजेरी दिसून आली. गावातील सर्व महिला मंडळ सुध्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. कार्यक्रमाला गावातील लोकांनी सुध्या खूप सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी केला. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता कु. ज्ञानेश्वरी चौधरी हिने अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, गावातील नागरीक या सर्वांचे आभार मानून केली.
