शिबिराचा २८ रुग्णांनी घेतला लाभ

227

The गडविश्व
गडचिरोली : तालुक्यातील गजनगुडा व मुलचेरा तालुक्यातील टिकेपल्ली येथे आयोजित गाव पातळी शिबिराचा लाभ एकूण २८ रुग्णांनी घेतला. या उपक्रमात रुग्णांना व्यसनाचे दुष्परिणाम सांगत उपचार घेण्यासाठी इतरही रुग्णांना प्रवृत्त करण्याचे आवाहन करण्यात आले.
गजनगुडा येथील शिबिराला १३ रुग्णांनी भेट दिली. या शिबिराचे नियोजन तालुका संघटक अमोल वाकुडकर यांनी केले. यशस्वीतेसाठी माजी सरपंच महादेव हीचामी यांनी सहकार्य केले. तसेच टिकेपल्ली येथे आयोजित शिबिरात १५ रुग्णांनी पूर्ण उपचार घेतला. शिबिराचे नियोजन तालुका संघटक रुपेश अंबादे यांनी तर यशस्वीतेसाठी पोलिस पाटील चंद्रा कोरेत, हिरामण कोरेत, मुक्तिपथ गाव संघटना अध्यक्ष तुळशीराम मडावी, भिमराव कोरेत, शंकर रामटेके यांनी सहकार्य केले.
दोन्ही शिबिरा दरम्यान रुग्णांना दारूची सवय कशी लागते, धोक्याचे घटक, दारूचे दुष्परिणाम, व्यसनामुळे आरोग्यावर होणारे परिणाम आदींबाबत मार्गदर्शन केले. संयोजक छत्रपती घवघवे यांनी सर्व रुग्णांची केस हिष्ट्री घेत दारूचे दुष्परिणाम पटवून दिले. तसेच गावातील इतर रुग्णांनाही गाव पातळी किंवा तालुका पातळीवरील शिबिरात उपचार घेण्यास प्रवृत्त करण्याचे आवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here