शहादा येथे राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाची बैठक संपन्न

283

– गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा येथे होणार विशेष दौरे

The गडविश्व
यवतमाळ : जिल्ह्यातील शहादा येथे राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम, महासचिव रमेश देसाई, नाशिक जिल्ह्यातील व यवतमाळ जिल्ह्यातील पदाधिकारी यांचा नंदुरबार जिल्हा दौरा असल्याने शहादा येथे जिल्ह्यातील विश्वगामी पत्रकार संघाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघा मार्फत जिल्ह्यातील आदर्श शिक्षकाना राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम व महासचिव रमेश देसाई, यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
तसेच याप्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम व सरचिटणीस रमेश देसाई यांचा सत्कार शाल व श्रीफळ देऊन करण्यत आला. तसेच विविध सामाजिक व वकील संघाचे पदाधिकारी यांनी देखील त्यांचा सत्कार केला. नंदुरबार, नाशिक व यवतमाळ जिल्ह्यातील पदाधिकारी, नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पत्रकार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिजाबराव पाटील, ऐड भोजराज शिंदे,कोठवाड़े, घनश्याम पाठक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर सरचिटणीस देसाई व राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांनी सुद्धा पत्रकाराना मार्गदर्शन केले.
यावेळी नंदुरबार जिल्ह्यातील शैक्षणिक, पत्रकारिता व विविध सामाजिक उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात अजबसिंग गिरासे (आमोदा), केवलसिंग राजपूत (अंकुशविहीर), एम.सोनार (), प्रा. ज्ञानी कुलकर्णी (शहादा), सुधीर वाकलकर(पचरीदेव), मनोज कुमारबाफना (शहादा), कल्पेश राजपूत (मंदाना ) यांचा समावेश आहे. या सर्व शिक्षाकांना शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देऊंन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी गिरधर मोरे, गिरासे , यशवंत कलाल यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रम अतिशय सुंदर रितीने पार पडला.
कार्यक्रमाचे प्रस्तविक जिल्हाध्यक्ष योगेश्वर बुवा यांनी केले तर सूत्रसंचालन हदयेश चव्हाण, आभार अनिल जावरे यांनी मानले.
नंदुरबार येथे दोन दिवस बागवान, फय्याज यांनी खुप चांगले नियोजन करून कार्यक्रम यशस्वी पार पाडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here