वैद्यराज व वनऔषधी लागवड करणाऱ्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण

410

The गडविश्व
गडचिरोली : वनविभागाच्या वतीने जिल्ह्यातील माडिया व आदिम प्रवर्गाच्या वैद्यराज व वनऔषधी लागवड करणाऱ्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन मुख्य वनसंरक्षक कार्यालयातील टीपागड सभागृहात करण्यात आले होते.
या प्रशिक्षण कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन गडचिरोली वनवृताचे वनसंरक्षक डॉ.किशोर मानकर (प्रा.) होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग रवींद्र ठाकरे, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय नागपूरचे अधीक्षक रवींद्र राऊत, गडचिरोली वनविभागाचे उपवनसंरक्षक मिलिश शर्मा, सहा. प्राध्यापक डॉ.घनश्याम कोडवानी, दत्तात्रय काटकर, डॉ.मनीष भोयर, सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके, सहा.प्रकल्प अधिकारी (शिक्षण) प्रभू सादमवार, प्रमोद वरगंटीवार, अनिल सोमनकार, सुधाकर गौरकार यांची उपस्थिती होती.प्रशिक्षणाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले विठ्ठल घोगरे यांनी प्रशिक्षणार्थ्यांना पारंपरिक औषधी बद्दल माहिती दिली. डॉ .गोगुलवार यांनी वन औषधी तयार करण्याबाबत मार्गदर्शन केले तर वनौषधी ओळखाण्याबाबत मिलिंद उमरे यांनी मार्गदर्शन केले.
वनौषधी ओळख व उपचार याबद्दल नंदाजी चलाख यांनी मार्गदर्शन केले, दुर्धर रोगांवर आयुर्वेदिक उपचारा बाबत कालीपद मलिक यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी उपस्थित मान्यवर व वैद्यराज यांनी गोंडवाना हर्ब्स येथे भेट दिली असता हनुमंत नरोटे यांनी गोंडवाना हर्ब्स प्रकल्पाविषयी माहिती दिली. प्रकाश उरकुडे यांनी वनौषधी तयार करून रोगांवर उपचार बाबत सखोल मार्गदर्शन केले तसेच मध्यवर्ती रोपवाटिकेला भेट देऊन विविध वनौषधी व गुणकारी रोपांची माहिती जाणून घेतली.कार्यक्रमाचे संचालन नेताजी अन्नपत्रवार, आभार सहा. वनसंरक्षक सोनल भडके यांनी मानले. या कार्यक्रमाला गडचिरोली जिल्ह्यातील वैद्यराज, वनौषधी लागवड लाभार्थ्याची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी अपेक्षा शिंदे, वनपाल के.एम.फाये, वनरक्षक शीतल कुळसंगे आदींनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here