वटपौर्णिमा निमित्त येनापुर येथे महिलांनी केले वृक्षारोपण

350

– जनहित ग्रामीण विकास संस्थेचा अनोखा उपक्रम
The गडविश्व
येणापूर : जनहित ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था येनापुर यांच्या पुढाकारातून वटपौर्णिमा निमित्त येनापुर येथे महिलांनी वृक्षारोपण करून समाजाला एक वेगळाच संदेश दिला. हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस “वटपौर्णिमा” म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. तसेच पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने वडाचे महत्त्व विशेष असल्याने त्याच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा ही पूजेचा एक हेतू आहे.
चामोर्शी तालुक्यातील येनापुर येथील काही महिलांनी वटपौर्णिमा साजरी करून वृक्षारोपण करण्याचे ठरविले त्यांच्या प्रतिसादाला साद देवून जनहित ग्रामीण विकास बहुउद्देशिय संस्थेचे सदस्य सौ. सूनिताताई बंडावार यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण करण्यात आले. सदर वृक्षारोपण कार्यक्रम ला उपस्थित वर्षा येलकुचेवार, स्मिता जक्कुलवार, चंदा गोपवार, रेखा बंडावार, वैशाली गोर्लावार, शामराव जक्कुलवार, मारोती येलकुचेवार, किशोर गोपवार, गणेश ताटकलवार,आकाश बंडावार, संस्थेचे कोषाध्यक्ष रवींद्र बंडावार, सदस्य रवींद्र जक्कुलवार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here