लम्पी आजाराचा गडचिरोली जिल्हयात शिरकाव

741
File Photo

– सतर्कता बाळगुन नियमांचे पालन करण्याचे जिल्हाधिकारी संजय मीणा यांचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, ७ नोव्हेंबर : जिह्यात लम्पी आजाराचा शिरकाव झाला असून सतर्कता बाळगुन नियमांचे पालन करण्याचे जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी आवाहन केले आहे.
महाराष्ट्र राज्यातील जळगांव, अहमदनगर, अकोला, पुणे, धुळे, लातुर, औरंगाबाद, बीड, सातारा, बुलढाणा,अमरावती, उस्मानाबाद, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्हयामध्ये गायवर्गीय पशुधनामध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
गडचिरोली जिल्हयातील शिवणी ता- गडचिरोली येथील पशुधनामध्ये पहिल्यांदा लम्पी स्किन डिसिज ( Lumpy Skin Desease) सदुष्य लागण झाल्याचे रोग लक्षणावरून निर्देशनास आले आहे. सदर बाधित जनावरांचे रोग नमुने गोळा करण्यात आलेले असून रोगाची खात्री करण्याकरिता प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेले आहेत.
शिवणी हे गाव बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले असून त्याच्या ठिकाणापासून ५ किलोमीटर विजेचा परिसर सर्तकता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. सतर्कता क्षेत्रात कनेरी, कुलखल, मुडझा,(बु), मुडझा,(तु),वाकडी, डोंगरगाव (बु), डोंगरगाव (तु), हिरापुर चक व कृपाळा हि गावे सामाविष्ठ आहे.
सदर गावामध्ये एकूण लसीकरण – ४३१० इतके झालेले आहेत. तरी सदर क्षेत्रातील गावामध्ये लसीकरणातून काही जनावरे सुटलेले असतील तर त्यांना नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याकडुन तात्काळ लसीकरण करून घेण्यात यावे,असे आवाहन जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी केले. गडचिरोली जिल्हयात एकूण ४,३०,००० लसमात्रा प्राप्त झाली असून आज तागायत ४,०४,४४६ इतके लसीकरण करण्यात आलेले आहे.
लम्पी चर्मरोग बाधित पशुमध्ये दिसून येणारी लक्षणे पाहता या आजारात पशुंना ताप येणे, पुर्ण शरीरावर १०-१५ मो.मी. व्यासाच्या कडक गाठी येणे,तोंड नाक व डोळयात व्रण निर्माण होणे,चारा चघळण्यास त्रास होणे, अशक्तपणा,भुक कमी होणे,वजन कमी होणे, दुध उत्पादन कमी होणे, डोळयातील व्रणामुळे दृष्टी बाधीत होणे, काही वेळा फुफुसदाह किंवा स्त्नदाह होणे, पायावर सुज येऊन लंगडणे, गाभण जनावरामध्ये गर्भपात होणे अशी लक्षणे दिसून येतात. या रोगाने बाधित जनावरे दोन-तीन आठवडयात बरी होतात. त्यामुळे वेळीच उपचार करुन घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी संजय मिणा यांनी केले.
या रोगाची जिल्हयामध्ये इतर तालुक्यात लक्षणे पशुमध्ये आढळून आल्यास प्रत्येक व्यक्ती/अशासकीय संस्था/संबंधीत स्थानिक स्वराज्य संस्था इ. यांनी प्राण्यामंधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ मधील कलम ४(१) अन्वये लेखी स्वरुपात नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेत तात्काळ कळविणे बंधनकारक आहे. यामध्ये दिरंगाई केल्यास प्राण्यामधील संक्रामक रव सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियत्रंण अधिनियम, २००९ मधील कलम ३२ येथील नमुद तरतुदीनुसार संबधीत खाजगी पशुवैद्यक, पशु व्यापारी, वाहतुकदार विरुध्द गुन्हा नोंद केला जावू शकतो यांची सर्व संबधितांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, गडचिरोली, डॉ.विलास गाडगे यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here