राष्ट्रीय सरपंच संसदच्या गडचिरोली जिल्हा समन्वयकपदी चांगदेव फाये यांची निवड

121

The गडविश्व
गडचिरोली, २३ नोव्हेंबर : पुणे येथील एमआयटी युनिव्हर्सिटी येथे पार पडलेल्या राष्ट्रीय सरपंच संसदेच्या दोन दिवशीय अधिवेशनातं राष्ट्रीय सरपंच संसदच्या गडचिरोली जिल्हा समन्वयकपदी चांगदेव फाये यांची निवड करण्यात आली आहे.
पुणे येथील एमआयटी युनिव्हर्सिटी मध्ये राष्ट्रीय सरपंच संसदेचे दोन दिवशीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले. अध्यक्षस्थानी एमआयटीचे कार्याध्यक्ष राहुल कराड होते तर विशेष अतिथी म्हणून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे आभासी पद्धतीने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा ओळखपत्र व नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी गडचिरोली जिल्हा समन्वयक म्हणून कुरखेडाचे चांगदेव फाये यांची निवड करण्यात आली. चांगदेव फाये हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक, राजकीय क्षेत्रात कार्य करीत असून कुरखेडा ग्रामपंचायतचे उपसरपंच, कुरखेडा पंचायत समिती सदस्य व त्यांचा विविध कार्यात सक्रिय सहभाग आहे. त्यांच्या या कामाची दखल घेऊन एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसदेचे संस्थापक राहुल कराड, राष्ट्रीय प्रमुख समन्वयक योगेश पाटील यांनी त्यांची जिल्हा समन्वयक म्हणून निवड केली आहे.
सदर पदाच्या माध्यमातून लोकांच्या सार्वजनिक विकासासाठी सर्व लोकप्रतिनिधींच्या समन्वयातून योग्य सहकार्य करणार असल्याचा विश्वास चांगदेव फाये यांनी यावेळी व्यक्त केला. फाये यांनी आपल्या निवडीचे श्रेय राष्ट्रीय सरपंच संसदचे राष्ट्रीय समन्वयक योगेश पाटील, सहसमन्वयक प्रकाश महाले, नागपुर विभाग समन्वयक संजय गजपुरे, वर्धा जि. प.चे माजी अध्यक्ष राष्ट्रीय सरपंच संसदचे पदाधिकारी सरिता गाखरे, गडचिरोली जिल्हाध्यक्ष दामोधर अरगेला व पदाधिकाऱ्यांना दिले आहे.

#changdev Faye #kurkheda #sarpancha sansad #don divs adhiveshan #pune #the gadvishva

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here