कुरखेडा : ३ लाख ७० हजारांचा मोह सडवा व दारू जप्त

134

– कुरखेडा पोलिसांची कारवाई, चार आरोपींना अटक
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा (Kurkheda), २३ नोव्हेंबर : स्थानिक पोलिसांनी तालुक्यातील साधूटोला, अरततोंडी व डिप्राटोला येथील अवैध हातभट्ट्यावर धडक कार्यवाहीचे सत्र सूरूच ठेवले असतांना अतिसंवेदनशील व दूर्गम भागातील चव्हेला येथे चार मोहा दारूच्या हातभट्टयावर धाड टाकून ३ लक्ष ७० हजाराचा मोह सडवा व दारू जप्त करून घटनास्थळावरच नष्ट केल्याची कारवाई करण्यात आली असून याप्रकरणी चार आरोपीना अटक केली आहे. बिसन शिवलाल मडावी (५५), प्रकाश पंडीत नैताम (४०), रणजित तानू हिचामी (३८), आनंदराव कलीराम मडावी (५०) असे आरोपींची नावे आहेत.
कुरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चव्हेला येथे मोठय़ा प्रमाणात अवैध मोह फूलाच्या दारूच्या हातभट्टया आहेत. येथूनच तालुक्याच्या अन्य ठिकाणी दारूचा पुरवठा होत असल्याची गुप्त पोलिस माहीती उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झरकर यांना मिळताच त्यांनी पोलीस चमूचे गठन करीत चव्हेला येथे धडक दिली. यावेळी गावालगत असलेल्या जंगलात ४ अवैध मोह फूलाच्या हातभट्टया आढळून आल्या. येथून ३ लाख ७० हजार रूपये किंमतीची १ हजार लिटर मोह दारू व १७०० लिटर मोह सहवा जप्त करण्यात आला व पंचा समक्ष सर्व माल घटनास्थळावरच नष्ट करण्यात आला. या प्रकरणी आरोपींविरुद्ध भादवि महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (इ) ६५ (फ) अन्वये गुन्हा दाखल करीत अटक केली.
सदर कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी साहील झरकर यांच्या मार्गदर्शनात साहायक पोलीस निरीक्षक दिनेश गावंडे, पोलीस उपनिरीक्षक कुलदिप सोनटक्के, पोलीस उपनिरीक्षक देवराव भांडेकर, पोलीस हवालदार विनोद बोगा, पोलीस हवालदार गौरीशंकर भैसारे, पोलीस नाईक मनोहर पूराम, खुशाल वालदे, शिपाई ललीत जांभुळकर यांनी केली.

#Kurkheda #gadchiroli #crime #daru #chevhela #kurkheda police #sahil Zarkar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here