राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटनेची यवतमाळ जिल्हा कार्यकारणी गठीत

275

– जिल्हा अध्यक्षपदी रामदास कांबळे तर जिल्हा उपाध्यक्षपदी राजू सोनुने यांची नियुक्ती
The गडविश्व
यवतमाळ : येथील शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाची बैठक पार पडली. यावेळी विदर्भ अध्यक्ष पद्ममाकर घायवान, प्रफुल्ल मेश्राम, रवि चरडे, संतोष डॉमाळे यांच्या उपस्थितीत नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली. यामध्ये राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी रामदास कांबळे तर उपाध्यक्षपदी राजू सोनुने व जिल्हा कार्याध्यक्षपदी किरण मुक्कावार, सचिव पदी अब्दुल रफिक यांची तर जिल्हा संघटक पदी सय्यद मुजीबोद्दीन, संपर्क प्रमुख पदी प्रकाश वानखेडे, प्रसिद्धी प्रमुख पदी कुणाल आठवले यांची यांची निवड करण्यात आली.
तिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही निवड प्रक्रिया सर्वानुमते पार पडली. संघटना सर्वांनी मिळवून मजबूत करावी अशी प्रतिक्रिया विदर्भ अध्यक्ष पद्माकर घायवान यांनी व्यक्त केली. या बैठकीला यवतमाळ जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here