रानडुकराच्या मासांची अवैध वाहतूक : आरोपींच्या आवळल्या मुसक्या

946

– दोन आरोपींना अटक, १६ ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी
The गडविश्व
गडचिरोली, ५ ऑगस्ट : रानडुकराच्या मासांची अवैध वाहतूक करणाऱ्या आरोपींच्या वनाधिकारी व वनकर्मचाऱ्यांनी मुसक्या आवळल्या आहे. या प्रकरणी दोघांना अटक केल्याची कारवाई २ ऑगस्ट रोजी करण्यात आली असून १६ ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. विजय विकास सरदार, मनोजीत दुखीराम गाईन दोघेही राहणार रवींद्रपूर अशी आरोपींची नावे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २९ जुलै रोजी चामोर्शी वनपरीक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या जामगिरी उपक्षेत्रातील आम्रपाली नियतक्षेत्रत्रात वनकर्मचारी सामूहिक गस्त करत असतांना रश्मीपूर ते रवींद्रपूर मार्गाने दुचाकीने रानडुकराच्या मासांची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. दरम्यान सदर मार्गावर पाळत ठेवली असता एमएच ३३ के ५४२१ क्रमांकाच्या दुचाकी वाहनाने दोघे इसम प्लास्टिक मध्ये काही तरी वाहतूक करत असतांना आढळून आले . त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता ते पळून गेले मात्र त्यांचा पाठलाग करून जामगिरी ते रवींद्रपूर रस्त्यावर पुन्हा अडवण्यात आले मात्र त्यांनी तिथेच वाहन व प्लस्टिक मध्ये असलेला सामान सोडून पळ काढला. यावेळी झडती घेतली असता प्लस्टिक मध्ये रानडुकराचे मास आढळून आले. त्यावरून अज्ञात आरोपीविरुद्ध वनगुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू असतांना २ ऑगस्ट रोजी संशयीत आरोपींना अटक केली असता त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. आरोपींना अटक करून ३ ऑगस्ट रोजी चामोर्शी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना १६ ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पुढील तपास वनविभाग करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here