The गडविश्व
मुंबई : राज्य मंत्रीमंडळातील सर्व मंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या बंगल्यांना आता गड आणि किल्ल्यांचे नावे देण्यात येणार आहे. राज्यभरातील शिवप्रेमींकडून यासाठी सतत पाठपुरवठा करण्यात आला होता. त्यांनी या संदर्भात उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे प्रस्ताव दिला होता. मंत्री उदय सामंत यांनी या प्रस्तावावर सकारात्मक पाठपुरवठा केला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंजुरीनंतर अखेर मंत्र्यांच्या शासकिय निवास्थानांचे नामांतर करण्यात आले. त्यामुळे आता मंत्र्यांच्या शासकिय निवास्थानांना राज्यातील प्रसिद्ध गड आणि किल्यांचे नावे मिळणार आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयानुसार पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या A6 बंगल्याला स्वराज्याची राजधानी ‘किल्ले रायगड’ असे नाव देण्यात आले. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या B2 बंगल्याला ‘रत्नसिंधु’ असे नाव देण्यात आले.