म.रा. नवनिर्मित नर्सेस संघटनेची कार्यकारिणी गठित

310

The गडविश्व
गडचिरोली : महाराष्ट राज्य नवनिर्मित नर्सेस संघटना ही १९२६ च्या कामगार कायदद्यानुसार तयार करण्यात आली. या संघटनेच्या गडचिरोली जिल्हा शाखेची नवीन कार्यकरिणी गठित करण्यात आली आहे.
संघटनेच्या अध्यक्ष म्हणून विमल अंबाडकर, उपाध्यक्ष ममता गेडाम, कार्याध्यक्ष लता लिहीणार, कोषाध्यक्ष भारती गोगे, सचिव मीनल वाळके, सहसचिव कल्पना बोडावार, संघटक शोभा गेडाम, तालुका संघटक सपना राठोड, राजकुमारी आत्राम, अरूणा बायस्कर, सल्लागार परवीन शेख, सुनंदा सलामे, कार्यकारी सदस्य शकुंतला पदा, सारिका गेडाम, सुनंदा मेकलवार, कुसुम मडावी, आरती बुटले आदींची निवड करण्यात आली आहे.
गडचिरोली सारख्या दुर्गम व अति दुर्गम भागामध्ये कार्य करणारया आरोग्य सेविका यांचे अनेक समस्या सोडविण्याकरिता व नर्सेस भगिनीला योग्य न्याय मिळवून देण्याकरिता संघटनेची निर्मिती करूण्यात आली आहे. जिल्हात तब्बल ५५३ आरोग्य सेविकांची पदे मंजूर असतांना फक्त २९० आरोग्य सेविका कार्यरत आहेत. उर्वरित पदे पाच वर्षापासून रिक्त आहेत. ती पदे नियमित भरण्यात यावी तसेच सध्या नविन पदे भरतांना कंत्राटी पध्दतीवर भरण्यात येत आहेत. अल्पशा पगारात शासन भरपूर प्रमाणात काम करून घेत आहे. त्यामुळे या कंत्राटी नर्सेसचे शोषण थांबविण्यात यावे, त्यांना नियमित करण्यात यावे अशा अनेक समस्यांचा वाचा फोडून योग्य न्याय देण्यात यावा यासाठी संघटनेची निर्मीती करण्यात आल्याचे नवनियुक्त पदाधिकारऱ्यांनी सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here