The गडविश्व
गडचिरोली : तालुक्यातील आंबेशिवणी येथे आज ‘राष्ट्रीय विज्ञान दिनाचे’ औचित्य साधून मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन गडचिरोलीच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिन’ साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम मॅजिक बस संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात व तालुका निरीक्षक देवेंद्र हिरापुरे यांच्या नेतृत्वात घेण्यात आला.
“मॅजिक बस (सर्वांगिण शिक्षण)कार्यक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी “खेळाद्वारे शिक्षण/जीवन कौशल्य विकास” हा उपक्रम मागील दोन वर्षापासून अविरतपणे राबविला जात आहे. उपक्रमाचे विषेश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये जीवन कौशल्य रुजविणे, माध्यमिक शिक्षण पूर्ण करणे व शिक्षण पूर्ण करीत असताना मुलींचे लग्नाचे वय वाढविणे, अशा हेतूने मॅजिक बस संस्था गडचिरोली जिल्ह्यात काम करीत आहे.
विज्ञान दिवस निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये विज्ञान प्रदर्शन व कोन बनेगा ज्ञानपती अशा स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देऊन अभिनंदन करण्यात आले.
ही स्पर्धा घेण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे आजचे युग हे विज्ञानाचे युग व स्पर्धेचे युग आहे. मुलांना विज्ञानाची आवड निर्माण करून व स्वतः चे ध्येय ठरवून शिक्षणाच्या प्रवाहात आणणे हे होते.
या कार्यक्रमाला उपस्थित अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक बांबोळकर, शिक्षिका शेख , शिक्षक सागर आत्राम, बालपंचायत मंत्रिमडळ व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
आंबेशिवणी येथील शाळेत असणारे मंत्रिमंडळनी कार्यक्रमाची आखणी केली, कार्यक्रमाचे संचालन उपमुख्यमंत्री आयुष भैसारे, प्रास्ताविक देवाजी बावणे, आणि मार्गदर्शन सुरेश बांबोळकर, आभार सागर आत्राम यांनी मानले.
राष्ट्रीय विज्ञान दिवस हा कार्यक्रम शाळेतील मंत्रिमंडळाच्या अथक परिश्रमाने हा पार पडला. तसेच या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी तेथील शिक्षक सागर आत्राम आणि मॅजिक बस इंडिया फाउंडेशन चे जिवन कौशल्य शिक्षक देवाजी बावणे यांनी अथक परिश्रम घेतले.