मानवधिकार आयोगाद्वारे राज्य शासनाच्या मुख्य सचिवांस वाईन-विक्री निर्णयाबाबत नोटीस

419

– गडचिरोली जिल्हा दारुमुक्ती संघटनेच्या तक्रारीची दखल
The गडविश्व
गडचिरोली : महाराष्ट्र शासनाचा वाईन विक्री निर्णय मुले, स्त्रिया आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला धोकादायक आहे. या निर्णयास हरकत म्हणून महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग यांना गडचिरोली जिल्हा दारुमुक्ती संघटनेद्वारा निवेदन पाठवण्यात आले होते. गडचिरोली जिल्हा दारूमुक्ती संघटनेचे अध्यक्ष डॉ. अभय बंग व उपाध्यक्ष देवाजी तोफा यांचे सहीने सदर निवेदन महाराष्ट्र शासनाला तसेच राष्ट्रीय मानवधिकार आयोग यांना ७ मार्च २०२२ रोजी पाठविण्यात आले होते. या निवेदना मध्ये वाईन विक्री नर्णय कसा चुकीचा आहे, याबाबत महत्वाच्या विविध मुद्द्यांची मांडणी करण्यात आली होती. या सर्व मुद्द्यांचा विचार करता मानवाधिकारास यामुळे धोका असून याचे उत्तर शासनाने द्यावे यासाठी शासनाचे मुख्य सचिव यांना आयोगाद्वारे नोटीस देण्यात आली आहे.
मानवअधिकार आयोगाने या निवेदनाची दखल घेऊन ९ मे २०२२ ला महाराष्ट्र शासनाचे सचिव यांना आयोगापुढे कोर्टात हजर होण्याबाबत समन्स बजावला आहे.कोर्टात हजर राहून कागदपत्रासहित आवश्यक माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here