The गडविश्व
नागेपल्ली : ग्रा.प.नागेपल्ली अंतर्गत येत असलेल्या बुर्क मलपल्ली येथील सिडाम कुटुंबातील मुलीच्या उपचारकरिता जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडून आर्थिक मदत करण्यात आली.
मलपल्ली येथील इंदूबाई गणेश सिडाम परिवार अत्यंत गरीब असून ते मोल मजूरी करुण आपले व आपल्या मुलींचे उधरनिर्वाह करीत होते. तर अचानक त्यांच्या कुटुंबातील १६ वर्षीय मुलगी मंगला गणेश सिडाम हिच्या पोटात दुखन उटल्याने रुग्णालयात नेले असता त्या मुलीला पोटाचा आजार असल्याची माहिती डॉक्टरानी दिली व पुढील उपचार करण्यास सांगिलले. मात्र आर्थिक परिस्तिथी हलाखीची असल्याने मुलीची आई इंदूबाई सिडाम यांनी माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांची भेट घेऊन सर्व आपबिती सांगितली तेव्हा कंकडालवार यांची तात्काळ आर्थिक मदत करत पुढील उपचार लगेच करण्यास सांगितले.
यावेळी अहेरीचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, अहेरी आविस शहर उपाध्यक्ष मिलिंदभाऊ अलोने, नागेपल्लीचे माजी सरपंच दिवाकर मडावी, महेश वडेट्टीवार, तसेच मुलीची आई इंदूबाई गणेश सिडाम उपस्थित होते.