The गडविश्व
गडचिरोली : स्थानिक श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था, गडचिरोली द्वारा संचालित फुले-आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, गडचिरोली यांच्या सांस्कृतिक व मराठी विभागाद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह अंतर्गत आज ७ एप्रिल २०२२ रोजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सर्व प्रथम कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मालार्पण व पुष्पार्पण करून करण्यात आली.
यावेळी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. खंगार तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठी विभाग प्रमुख प्रा. यादव गहाणे, आय.क्यू.ए.सी. प्रमुख प्रा. विनोद कुकडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. वर्षा तिडके आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी महाविद्यालयीन बहुतेक विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेतला.
वक्तृत्व स्पर्धेतील प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यांना प्रमाणपत्र व पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमात महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सांस्कृतिक विभागातील कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
