पोलीस – नक्षल चकमकीत २ जवान जखमी

716

– भीषण चकमकीत अनेक नक्षलीही जखमी झाले असल्याची शक्यता
The गडविश्व
सुकमा : छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील केरलापाल पोलीस स्टेशनच्या हद्दीत आज सकाळच्या सुमारास पोलीस आणि नक्षल्यांमध्ये भीषण चकमक उडाली. या चकमकीत २ डीआरजीचे जवान जखमी झाले झाले असल्याची माहिती आहे.तसेच या चकमकीत अनेक नक्षली जखमी असल्याचेही शक्यता वर्तवली जात आहे.प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यातील केरलापाल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिचोरगुडा जवळ मोठ्या प्रमाणात नक्षली असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे डीआरजी पथक कारवाई करिता जंगल परिसरात शोधमोहीम राबवित असतांना सकाळच्या सुमारास अधित घात लावून बसलेल्या नक्षल्यांनी जवानांच्या दिशेने अंधाधुद गोळीबार केला. यावेळी जवानांनीही चोख प्रत्युत्तर देत गोळीबार केला. सदर चकमक सुमारे अर्धा तास चालली. दरम्यान यात डीआरजीचे दोन जवान जखमी झाले आहे.त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. चकमकी नंतर घटनास्थळी शोधमोहीम राबविली असता रक्ताचे डाग दिसून आले. त्यामुळे या चकमकीत नक्षली जखमी झाले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here