पं.स.सभापती भास्कर तलांडे यांच्या हस्ते ग्रामीण व्हॉलीबाल व कबड्डी स्पर्धेचे उदघाटन

243

– नवयुवक क्रीडा मंडळ तुमीरकसाच्या वतीने स्पर्धेचे आयोजन

The गडविश्व
अहेरी : तालुक्यातील मेडपली ग्राम पंचायत अतंर्गत येत असलेल्या तुमीरकसा येथे नवयुवक क्रीडा मंडळ यांच्या वतीने आयोजित ग्रामीण व्हॉलीबाल व कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिला पारितोषिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून होता तर दूसरा व तिसरा असे व्हॉलिबाल व कबड्डी साठी सहा पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे.
आज सदर स्पर्धेचे उदघाटन अहेरी पंचायतीचे सभापती भास्कर तलांडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मेडपलीचे सरपंच निलेश वेलादी, पेरमिलीचे सरपंचा सौ.किरण कोडापे, माजी सरपंच प्रमोद आत्राम, दिवाकर तलांडी, देवतडे, दहागावकर, सचिव मडावी, महारू तलांडी, प्रकाश दुर्गे, उरेत्ते आदि उपस्थित होते.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष दलशू आत्राम,देसू तलांडी, रमेश नरोटे, चरणदास नैताम, सतीश तलांडी आदि व गावकरी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here